शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

अवैध गौण खजिन वाहतूकदारांची वाढती मुजोरी, तहसीलदारांच्या वाहनांवर वाळूचे ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 11:30 IST

पहाटेची घटना, आरोपी ट्रॅक्टरसह पोलिसांच्या ताब्यात

अमळनेर, जि. जळगाव : चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांच्या वाहनात गस्तीवर असणाऱ्या पथकाला वाळूच्या ट्रॅक्टरने धडक देऊन उडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना ९ रोजी पहाटे तालुक्यातील खरदे ते वासरे रस्त्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टरसह पावणे तीन लाख रुपयांचा माल जप्त करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशानुसार मंडलाधिकारी भानुदास शिंदे हे तलाठी स्वप्नील कुलकर्णी, गौरव शिरसाठ, केशव यांच्यासह चालक बाळकृष्ण जाधव यांना घेऊन तहसीलदारांचे वाहन क्रमांक एमएच १९. सीव्ही ४१८ घेऊन अवैध गौण खनिज चोरीला आळा बसवण्यासाठी गलवाडे जैतपिर परिसरात ८ रोजी रात्रीपासून गस्त घालत असताना ९ रोजी पहाटे खरदे ते वासरे रस्त्यावर त्यांना समोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर येताना दिसले. त्यांनी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९, ८०७ वरील चालक भीमराव कैलास वानखेडे रा. चौबारी याने सरळ तहसीलदारांच्या वाहनांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. यात तहसीलदारांच्या गाडीचे १० ते १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. मंडलाधिकारी शिंदे यांनी मारवड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून भीमराव वानखेडे विरुद्ध शासकीय कामात अडथळा, मालमतेचे नुकसान, चोरी व अपघाताचा गुन्हा दाखल केला असून आरोपी वानखेडे याला ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील २ लाख ७० हजार रुपयांचे ट्रॅक्टर, ट्राली वाळूसह जप्त करण्यात आले आहे. तपास सहाययक पोलीस निरीक्षक राहुल फुला करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव