महामार्गावर वेग वाढविला; पावणेआठ लाख केले वसूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:19+5:302021-09-08T04:22:19+5:30

सुनील पाटील जळगाव : महामार्गावर वाहन चालवायचे असेल तर वेगमर्यादेचे पालन करावेच लागणार आहे, त्याचे उल्लंघन केले तर आपल्यावर ...

Increased speed on the highway; Fifty eight lakhs recovered! | महामार्गावर वेग वाढविला; पावणेआठ लाख केले वसूल !

महामार्गावर वेग वाढविला; पावणेआठ लाख केले वसूल !

सुनील पाटील

जळगाव : महामार्गावर वाहन चालवायचे असेल तर वेगमर्यादेचे पालन करावेच लागणार आहे, त्याचे उल्लंघन केले तर आपल्यावर वाहनावर केव्हा कारवाई होईल हे कळणारही नाही. वेगमर्यादा मोजण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री व कॅमेरा असलेले महागडे असे इंटरसेप्टर वाहन पोलीस दलात दाखल झालेले आहे. या वाहनाने जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान वेगमर्यादा ओलांडणाऱ्या १ हजार ८२ वाहनांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ७ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

इंटरसेप्टर व्हेइकलमध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन आहे. पूर्वी रस्त्याच्या कडेला थांबून, स्पीडगनद्वारे कारवाई केली जात होती. आता नव्या वाहनात स्पीडगन ठेवण्याची सुविधा (ट्रायपॉड) आहे. एखादे भरधाव वाहन गेले व स्पीडगनव्दारे त्याचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे कळते. त्यानुसार व्हेईकलमधील कॅमेऱ्याव्दारे ४०० मीटरपर्यंतच्या वाहनाचे छायाचित्र काढले जाते. वाहनाच्या क्रमांकावरून थेट वाहन मालकाला थेट ई चलन पाठविले जाते.

मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी या वाहनात ब्रेथ ॲनलायझर यंत्रणा उपलब्ध आहे. मद्याच्या नशेत वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जागेवरच कारवाई करणे आता शक्य होणार आहे. ७५ मायक्रॉनपेक्षा कमी काळी फिल्म वाहनांच्या काचांवर लावण्यास बंदी आहे. या व्हेईकलमध्ये वाहनांच्या काचांवरील फिल्मची तपासणी करण्यात येते.

महामार्गावर कोणत्या महिन्यात किती दंड

महिना दंड

जानेवारी ११६५००

फेब्रुवारी ११४५००

मार्च १८१५००

एप्रिल ११७५००

मे ५१०००

जून २००००

जुलै ३२०००

ऑगस्ट ९५००

धावत्या गाडीचा मोजला जातो वेग

महामार्गावर ८०ची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त वेगाने वाहन धावत असेल तर इंटरसेप्टर वाहनातील कॅमेऱ्याद्वारे वाहनाचा वेग मोजला जातो. वेगमर्यादेचे उल्लंघन केले तर एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो. तीन किमीपर्यंत वाहनाचा वेग मोजला जातो, मात्र वाहन चारशे मीटरपर्यंत असल्यास वाहनाचा स्पष्ट क्रमांक त्यात दिसतो, त्यामुळे याच अंतरावरून पोलिसांकडून वाहन मोजले जाते.

एसएमएसवर मिळते पावती

वेगमर्यादेचे उल्लंघन केले असेल तर वाहन क्रमांकाच्या आधारावर संबंधित वाहन मालकाला मोबाइल एसएमएस प्राप्त होतो, मात्र त्यासाठी वाहन नोंदणीच्या वेळी जो क्रमांक दिला असेल त्यावरच हा मेसेज जातो. क्रमांक अपडेट असेल तरीदेखील मेसेज प्राप्त होतो, मात्र तसे नसेल तर मेसेज जात नाही, त्या वाहनावर दंड प्रलंबित दिसतो. नाकाबंदीच्यावेळी वाहन तपासणीत असे वाहन निष्पन्न करून जागेवरच दंड वसूल केला जात असल्याची माहिती इंटरसेप्टर वाहनातील पोलीस अमलदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Web Title: Increased speed on the highway; Fifty eight lakhs recovered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.