चांदीच्या भावात एक हजाराने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST2021-07-07T04:20:26+5:302021-07-07T04:20:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चार दिवसांपूर्वी भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात सोमवारी पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ...

An increase of one thousand in the price of silver | चांदीच्या भावात एक हजाराने वाढ

चांदीच्या भावात एक हजाराने वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चार दिवसांपूर्वी भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात सोमवारी पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ७१ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. सोन्याच्याही भावात १०० रुपयांनी वाढ होऊन ते ४८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.

जून महिन्यातील पहिल्या आठवड्याचा अपवाद वगळता सातत्याने घसरण होत गेलेल्या सोने-चांदीच्या भावात जुलै महिन्याची सुरुवात होताच भाववाढ सुरू झाली होती. यामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी १ जुलै रोजी चांदी ७० हजारांच्या पुढे जाऊन ७० हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली होती. २ जुलै रोजी मात्र त्यात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७० हजार रुपये प्रति किलोवर आली. आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार, ५ जुलै रोजी चांदीत पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन ती ७१ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली.

अशाच प्रकारे सोन्याचेही भाव जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाढत असून ५ जुलै रोजी त्यात पुन्हा १०० रुपयांची वाढ होऊन ते ४८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने चांदीला मागणी वाढत असल्याने भाववाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: An increase of one thousand in the price of silver