शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

पाणीटंचाई आराखडय़ात 36 गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 00:14 IST

पारोळा : टंचाईग्रस्त गावांसाठी विहीर, कूपनलिका अधिग्रहीत करण्याचे प्रस्ताव, उपाययोजना सुरू

पारोळा : तालुक्याचा संभाव्य पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात 36 गावांचा पाणीटंचाई समस्याग्रस्त गावांमध्ये समावेश केला आहे. पाणीटंचाई निवारणार्थ आतापासून प्रय}ांची गरज आहे.पारोळा तालुका अवर्षण-प्रवण क्षेत्रात मोडतो. त्यातच गेल्या दोन-तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा परिणाम पाणीसाठय़ावर झालेला आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. मात्र त्यामुळे तालुक्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकली नाहीत. याचा परिणाम आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईवर होऊ शकतो. उन्हाळ्यात भासणा:या संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा पंचायत समितीतर्फे नुकताच तयार करण्यात आला असून, त्यात 36 गावांना टप्प्याटप्प्याने पाणीटंचाईची झळ बसू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या आराखडय़ात पाणीटंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनाही केलेल्या आहेत.यात पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च 17 यादरम्यान मोहाडी, दहीगाव, खोलसर, शिरसोदे, जिराळी, बहादरपूर, कोळपिंप्री, धूळपिंप्री, भिलाली, मंगरूळ, वसंतनगर, पुनगाव, आंबापिंप्री, मोंढाळे प्र.अ., चिखलोद बु.।।, नेरपाट, पिंपळभैरव, दळवेल, पिंपळकोठा तांडा अशा 17 गावांना पाणीटंचाईची शक्यता आहे. यात 10 गावांना विहीर अधिग्रहणसाठी 7.5 लाख रुपये, तर पिंपळभैरव गावासाठी नवीन विंधन विहीर, कूपनलिका यासाठी 30 हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे. तसेच शिरसोदे, बहादरपूर, भिलाली, मोंढाळे प्र.अ., दळवेल या चार गावांना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नळ योजना दुरुस्तीबाबत सुचविण्यात आले आहे. त्यासाठी पाच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.पिंपळकोठा तांडा या गावाला तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुमारे दोन लाख रुपये खर्चाची सुचविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 18 कामांवर 14 लाख 90 हजारांचा खर्च अपेक्षित आहे.संभाव्य पाणीटंचाईचा दुस:या टप्पा एप्रिल 17 ते जून 17 असा आहे. यात 17 गावांचा संभाव्य पाणीटंचाईत समावेश करण्यात आला आहे. त्यात 17 कामांना 15 लाख 28 हजार रुपये  खर्च अपेक्षित आहे. या टप्प्यात पाणीटंचाईसाठी टेहू, पोपटनगर, सुमठाणे, चोरवड, शेवगे प्र.ब., लोणी खुर्द, लोणी बु.।।, वाघरे, शिवरे दिगर, शेळावे बु.।।, शेळावे खुर्द, मेहू, हनुमंतखेडा, रामनगर, इंधवे, हिवरखेडा खुर्द, उडणीदिगर, शेवगे बु.।। या गावांचा समावेश आहे. यापैकी शेवगे प्र.ब., रामनगर, इंधवे, उडणीदिगर, शेवगे बु.।। या सहा गावांना खाजगी विहीर अधिग्रहण सुचविण्यात आले आहे. त्यासाठी 2.28 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुमठाणे, पोपटनगर, चोरवड, लोणी खुर्द, लोणी बु.।।, वाघरे, शिवरे दिगर, शेळावे खुर्द, शेळावे बु.।।, मेहू, हनुमंतखेडा या 10 गावांना नळ योजना दुरुस्ती करण्याचे आराखडय़ात सुचविण्यात आले आहे. त्यासाठी 10 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तर हिवरखेडा बु.।। या गावाला तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना सुचविली असून, त्यासाठी तीन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. दुस:या टप्प्यात 17 गावांसाठी 17 योजनेत 15 लाख 28 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. पळासखेडा बु.।। या गावासाठी नळ योजना दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. त्यासाठी 10 लाखांचा आणि वडगाव प्र.अ. या गावाला खाजगी विहीर अधिग्रहणसाठी एक लाख 10 हजारांचा खर्च कृती आराखडय़ात सुचविण्यात आला आहे. पारोळा पंचायत समिती कार्यालयाकडे वडगाव प्र.अ.जिराळी, आंबापिंप्री, मोरफळ, मोरफळी या गावांचे विहीर अधिग्रहणासाठी प्रस्ताव आले आहेत.        (वार्ताहर)