राज्यस्तरीय कोविड प्रशिक्षणाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:20 IST2021-09-09T04:20:51+5:302021-09-09T04:20:51+5:30
जळगाव : जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दोन दिवसीय ...

राज्यस्तरीय कोविड प्रशिक्षणाचे उद्घाटन
जळगाव : जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दोन दिवसीय कोविड प्रशिक्षण मंगळवारी घेण्यात आले. त्याचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रसंगी मंचावर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोळे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते.
सुरुवातीला दीपप्रज्वलन करून प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी विद्याशाखा सदस्य जयश्री दंडगव्हाळ, सुनील शिंदे, कार्यक्रम सहायक योगेश वाणी परिश्रम घेत आहेत.
कोट -
कोरोना थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय यंत्रणेने प्रयत्न केले. विविध उपाययोजना केल्या. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली. आता संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी दुर्लक्ष न करता कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी मास्क, स्वच्छता, अंतर ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवावी.
- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता