शिवस्मारकाचे चिंचोलीत उद्घा‌टन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:27+5:302021-07-22T04:12:27+5:30

किनगाव, ता. यावल : चिंचोली येथे शिवस्मारकाचे उद्घा‌टन थाटात झाले. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई ...

Inauguration of Shivsmarak at Chincholi | शिवस्मारकाचे चिंचोलीत उद्घा‌टन

शिवस्मारकाचे चिंचोलीत उद्घा‌टन

किनगाव, ता. यावल : चिंचोली येथे शिवस्मारकाचे उद्घा‌टन थाटात झाले.

यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आ. शिरीष चौधरी, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार गुलाबराव देवकर, वाल्मीक पाटील, ललित बागुल, एल. टी. पाटील, मुकेश येवले, सुभाष सोळुंके, आर. जी. पाटील, सरपंच सुमित्रा सोळुंके, वडगाव सरपंच विजया पाटील, जि.प. सदस्य रवींद्र पाटील, परम संत बाबा महाहंसजी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांचा कार्यक्रमाचे आयोजक व राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल साठे व माजी सरपंच अनिल सोळुंके व चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवस्मारकाचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी गावातील प्रवेशद्वाराजवळ वृक्षारोपणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Shivsmarak at Chincholi