जळगावात ‘निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी हायटेक तंत्रज्ञान’ विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 13:26 IST2018-01-07T13:19:56+5:302018-01-07T13:26:34+5:30

मान्यवरांची उपस्थिती

Inauguration of Seminar on Banana Production | जळगावात ‘निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी हायटेक तंत्रज्ञान’ विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन

जळगावात ‘निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी हायटेक तंत्रज्ञान’ विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन

ठळक मुद्देकेळी उत्पादनाबाबत विविध विषयांवर मार्गदर्शनसोमवारी केळी बागांना भेटी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 07-  भारतीय कृषी संशोधन परिषद व राष्ट्रीय केळी संशोधन  केंद्र त्रिची (तामिळनाडू) यांच्यावतीने आयोजित ‘निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी हायटेक तंत्रज्ञान’ या विषयावरील परिसंवादाचे रविवार 7 रोजी जळगाव येथे  उद्घाटन झाले. या वेळी  राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या निर्देशक डॉ. एस. उमा, केळी तज्ज्ञ के.बी. पाटील उपस्थित होते. सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत  भुसावळ रोडवरील हॉटेल कमल पॅराडाईमध्ये हा परिसंवाद होत असून यामध्ये केळी उत्पादनाच्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. 8 रोजी परिसरातील केळी बागांना शास्त्रज्ञांच्या भेटीद्वारे प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शनही होणार आहे. राहणार आहेत. या परिसंवादास केळी उत्पादक शेतकरी मोठय़ा संख्यने उपस्थित आहेत. 

Web Title: Inauguration of Seminar on Banana Production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.