मिशन ऑलिंपिक अंतर्गत सेल्फी पॉइंटचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:04+5:302021-07-18T04:13:04+5:30
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास वर्ग आणि पूर्वतयारी वर्गांसाठी या वास्तूची निर्मिती केली जात असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ...

मिशन ऑलिंपिक अंतर्गत सेल्फी पॉइंटचे उद्घाटन
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास वर्ग आणि पूर्वतयारी वर्गांसाठी या वास्तूची निर्मिती केली जात असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव महेश देशमुख हे होते तर माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन सुरेश देवरे आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मिशन ऑलिंपिक अंतर्गत ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटचेदेखील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला डॉ. जयंत पाटील, प्रा. एस. झेड. तोतला, भागचंद राका, वासुदेव महाजन, दत्तात्रय पवार, खलील देशमुख, रणजित पाटील, ललित वाघ, सतीश चौधरी, प्र. प्राचार्य डॉ. वासुदेव वले, माजी प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ. के. एस. इंगळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.जी. बी. पाटील, पर्यवेक्षक संजीव पाटील, प्रा. पी. आर. सोनवणे, प्रा. आर. एस. मांडोळे, डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. एस. आर. ठाकरे यांनी परिश्रम घेतले.
170721\img_20210717_102632.jpg
महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करताना माजी आमदार दिलीप वाघ संस्थेचे चेअरमन संजय वाघ आणि मान्यवर