Inauguration of RO plant at Anjan Vihire and Wakatuki | आरओ प्लँटचे अंजन विहिरे व वाकटुकी येथे उद्घाटन

आरओ प्लँटचे अंजन विहिरे व वाकटुकी येथे उद्घाटन

धरणगाव : तालुक्यातील वाकटुकी व अंजनविहिरे येथे प्लँटचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी केले.
अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जि.प.सदस्य गोपाल चौधरी होते
अंजन विहिरे व वाकटुकी गावासाठी रवींद्र चव्हाण, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मागणीनुसार पालकमंत्री पाटील यांनी विविध कामे मंजूर केली. यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांच्या निधी दिल्याबद्दल ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, शेतकरी व ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पं.स. सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि.प. सदस्य गोपाल चौधरी, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, पोलीस निरीक्षक पवन देसले, वाकटुकी सरपंच भागा पाटील, अंजनविहीरे सरपंच विलास चव्हाण, उपसरपंच उमेश पाटील, गणेश पाटील, महेश पाटील, भरत पाटील, रवी चव्हाण, सचिन पवार, पोलीस पाटील, तालुका कृषी अधिकारी दीपक माळी, रामकृष्ण पाटील, रवींद्र पाटील, गोपाल पाटील, महेंद्र वंजारी, डी.ओ. पाटील, मोतीलाल पाटील , पंजाबराव पाटील, ग्रामसेवक अनिल पाटील, रोहिदास पाटील, खंडेराव पाटील, मुरलीधर पाटील यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामसेवक संघटनेचे पंजाबराव पाटील, रवी चव्हाण यांनी केले. आभार अनिल पाटील यांनी मानले.

Web Title: Inauguration of RO plant at Anjan Vihire and Wakatuki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.