पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST2021-08-24T04:21:02+5:302021-08-24T04:21:02+5:30

प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी केले. राजेंद्र, चिंचोले प्रा. डॉ. दिनेश तांदळे, डीवायएसपी भारत काकडे व उपाध्यक्ष ...

Inauguration of pre-recruitment training camp | पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन

प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी केले. राजेंद्र, चिंचोले प्रा. डॉ. दिनेश तांदळे, डीवायएसपी भारत काकडे व उपाध्यक्ष व्ही. टी. जोशी यांची भाषणे झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. टी. जोशी होते. यावेळी संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ ,उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, संस्थेचे संचालक खलील देशमुख, सुरेश देवरे, प्रकाश एकनाथ पाटील, प्रा. भागवत महालपुरे, योगेश पाटील, सतीष चौधरी, वासुदेव महाजन, शशिकांत चंदिले, नितीन तावडे, माजी प्राचार्य बी. एन. पाटील, प्राचार्य एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य जी. बी. पाटील, प्रा. राजेश मांडोळे, संजय सूर्यवंशी, प्रा. डॉ. गोपाळ आदी प्रा. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यालयीन अधिकारी वर्ग उपस्थित होता.

या शिबिरात लेखी परीक्षेसंबधी प्राचार्य वासुदेव वले, प्रा. राजेंद्र चिंचोले, दिपक पाटील, योगेश शिंपी, नरेंद्र पाटील, प्रा. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले तर मैदानी परीक्षेसंबंधी एन. आर. ठाकरे, प्रा. डाॕ. दिनेश तांदळे, डाॉ. सचिन भोसले, जी. एन. पाटील, प्रा. गिरीष पाटील, महेश चिंचोले, संजय दत्तू आदी मार्गदर्शन करणार आहेत.

सूत्रसंचालन प्रा. माणिक पाटील यांनी केले तर आभार प्रा. के. एस. इंगळे यांनी मानले.

Web Title: Inauguration of pre-recruitment training camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.