रेडक्रॅासच्या ऑक्सिजन बँकचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:40+5:302021-07-07T04:21:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे मोहाडी येथील महिला रुग्णालयात ‘ऑक्सिजन बँक’ या नवीन उपक्रमाचे ...

रेडक्रॅासच्या ऑक्सिजन बँकचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे मोहाडी येथील महिला रुग्णालयात ‘ऑक्सिजन बँक’ या नवीन उपक्रमाचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. भविष्यात ऑक्सिजनची गरज पडल्यास कुणाला अडचण निर्माण होऊ नये म्हणून "ऑक्सिजन बँक" या संकल्पनेतून हे नियेाजन करण्यात आले आहे. यात १४ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर तसेच दोन ड्युरा सिलिंडर यांचा समावशे आहे.
उद्घाटन सोहळ्याला पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद निकुंभ, शासकीय महिला रुग्णालय मोहाडी येथील व्यवस्थापक डॉ. यु. बी. तासखेडकर, डॉ. विलास मालकर, डॉ. सतीश सुरळकर, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सहसचिव राजेश यावलकर, कार्यकारिणी सदस्य अनिल शिरसाळे, डॉ. अपर्णा मकासरे, पुष्पा भंडारी आदी उपस्थित होते.
सूत्र संचालन रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांनी केले. रेडक्रॉसमार्फत चाळीस लाख रुपये खर्च करून संपूर्ण तालुक्यात लावलेल्या या ड्युरा सिलिंडरमुळे जळगाव जिल्ह्यात कुठे ही ऑक्सिजन अभावी कोणतीही अप्रिय घटन घडली नाही याचे आंतरिक समाधान असल्याचे गनी मेमन यावेळी म्हणाले.