सायगाव येथे मानव हित लोकशाही पक्षाचे शाखेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:16+5:302021-09-07T04:20:16+5:30
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे व महासचिव गणेश भगत यांचे सायगाव येथील नव्या बसस्टँपासून ...

सायगाव येथे मानव हित लोकशाही पक्षाचे शाखेचे उद्घाटन
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे व महासचिव गणेश भगत यांचे सायगाव येथील नव्या बसस्टँपासून फटाके वाजवून व वाजतगाजत स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. तालुकाध्यक्ष दीपक चांदणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व मान्यवरांच्या हस्ते शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश संपर्कप्रमुख अशोक बाविस्कर व जिल्हाध्यक्ष सुनील पाचुंदे, संघटक मोहन बिराडे, तालुकाध्यक्ष दिपक चांदणे, उपाध्यक्ष रवींद्र काळोखे, मधुकर साबळे, दिनेश महाजन, छोटू बागूल, सोमनाथ माळी, भगवान माळी, तालुका कार्याध्यक्ष विजय मरसाळे, तालुका महिला आघाडी अध्यक्षा ज्योतीबाई महाले, सल्लागार रमेश शिरसाठ, रवींद्र साबळे, गोविंद साबळे, दिलीप साबळे, रावसाहेब साबळे, संजय साबळे, गजानन चंदनाशिव, रमेश चांदणे, समाधान साबळे, एकनाथ साबळे, राहुल मरसाळे, आशा चांदणे, शितल साबळे, प्रियंका साबळे उपस्थित होते. दीपक चांदणे यांनी आभार मानले.