हरी रावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:24+5:302021-09-25T04:15:24+5:30
कर्मवीर हरी रावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन महिंदळे, ता. भडगाव : येथील माध्यमिक विद्यामंदिरात संस्थेचे संस्थापक कर्मवीर हरी रावजी ...

हरी रावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन
कर्मवीर हरी रावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन
महिंदळे, ता. भडगाव : येथील माध्यमिक विद्यामंदिरात संस्थेचे संस्थापक कर्मवीर हरी रावजी पाटील यांच्या विसाव्या पुण्यस्मरण सप्ताहास सुरुवात झाली.
या सात दिवसीय सप्ताहात विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्याचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रकाश संभाजी पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून स्कूल कमिटी सदस्य भगवान धनसिंग पाटील उपस्थित होते.
यावेळी हरी रावजी पाटील यांच्या जीवनावर भाग्यश्री भास्कर पाटील या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले.
शिक्षक डी. डी. पाटील यांनीही बाबांच्या कार्याचा गौरव केला. मुख्याध्यापकांनी, बाबांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचे कसे वटवृक्षात रूपांतर झाले याविषयी माहिती दिली. के. एम. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.