लाडकूबाई विद्यामंदिरात हरी पाटील पुण्यस्मरण सप्ताहाचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:39+5:302021-09-24T04:18:39+5:30
या सप्ताहात शिवव्याख्यान, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, ॲड मॅड शो, नृत्य स्पर्धा, गीतगायन, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजूषा अशा विविध ...

लाडकूबाई विद्यामंदिरात हरी पाटील पुण्यस्मरण सप्ताहाचे उदघाटन
या सप्ताहात शिवव्याख्यान, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, ॲड मॅड शो, नृत्य स्पर्धा, गीतगायन, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजूषा अशा विविध ऑनलाईन स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संस्थेच्या संचालिका कमलताई आजी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्या वैशाली पाटील, लाडकूबाई प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे, उपप्राचार्य ए. एस. पाटील, पर्यवेक्षक आर. डी. महाजन उपस्थित होते. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पाचोरा येथील प्रसिद्ध युवा व्याख्याते हर्षल देसले यांचे ‘शिवरायांसी आठवावे, पण कशासाठी?’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. तसेच इ. पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी असे दोन गट करून रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक पी. जी. सोनवणे व वैशाली देवरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दीपक भोसले यांनी सूत्रसंचालन व व्ही. एस. पाटील यांनी आभार मानले.