न्हावी येथील पेयजल योजनेचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:20 IST2021-08-14T04:20:09+5:302021-08-14T04:20:09+5:30

गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, अशी अपेक्षा गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. तर ...

Inauguration of Drinking Water Scheme at Nhavi | न्हावी येथील पेयजल योजनेचे उद्‌घाटन

न्हावी येथील पेयजल योजनेचे उद्‌घाटन

गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, अशी अपेक्षा गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

तर मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी राजकारणाचे जोडे बाहेर काढून एकत्रित आले तर कारखाना सुरू होऊ शकतो यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे महाजन म्हणाले.

माजी पदाधिकाऱ्यांचाही सत्कार

ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत सर्व हयात माजी सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार विद्यमान ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.के. जी. पाटील यांनी केले तर आभार उपसरपंच उमेश बेंडाळे यांनी मानले. प्रास्ताविक सरपंच भारती नितीन चौधरी यांनी केले. मनोगतातून शरद महाजन यांनी सविस्तर माहिती दिली.

न्हावी येथील कार्यक्रमास उपस्थित गुलाबराव पाटील, गिरीश महाजन व मान्यवर.

130821\img-20210813-wa0116.jpg

मुख्यमंत्री पेजल योजना उद्घाटन व कोनशिला अनावरण

Web Title: Inauguration of Drinking Water Scheme at Nhavi