रोटरी क्लब भुसावळचा पदग्रहण समारंभ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:35+5:302021-07-09T04:11:35+5:30
या वर्षाकरिता क्लबचे अध्यक्ष म्हणून राजेंद्रकुमार फेगडे यांनी गजानन ठाकूर यांच्याकडून पदभार स्वीकारला व डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्याकडून ...

रोटरी क्लब भुसावळचा पदग्रहण समारंभ उत्साहात
या वर्षाकरिता क्लबचे अध्यक्ष म्हणून राजेंद्रकुमार फेगडे यांनी गजानन ठाकूर यांच्याकडून पदभार स्वीकारला व डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्याकडून सचिव म्हणून राजेंद्र पाटील यांनी पदभार घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत नाईक यांनी केले तसेच आभार प्रदर्शन आरती चौधरी यांनी केले. अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब सोनवणे व पदाधिकाऱ्यांनी रोटरी क्लबसाठी ११ हजाराची मदत केली. माजी अध्यक्ष गजानन ठाकूर यांनीही ११ हजाराची देणगी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीचे कर्मचारी मनोज गुलाईकर व सदस्यांनी परिश्रम घेतले.
जी. आर. ठाकूर यांच्याकडून पदभार स्वीकारताना राजेंद्र फेगडे. सोबत डावीकडून राजेंद्र पाटील, आरती चौधरी, विलास भाटकर, संगीता पाटील. (छाया : श्याम गोविंदा)