शिवसंपर्क अभियानांतर्गत चार गावांमध्ये शाखेचे उद‌्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:16 IST2021-07-26T04:16:43+5:302021-07-26T04:16:43+5:30

या शिवसंपर्क अभियान अंतर्गत ढेकू, सारबेटे, हेडावे, पळासदडे या चार गावांमध्ये शाखा उद्घाटन व सभासद नोंदणी करण्यात आली. या ...

Inauguration of branches in four villages under Shiv Sampark Abhiyan | शिवसंपर्क अभियानांतर्गत चार गावांमध्ये शाखेचे उद‌्घाटन

शिवसंपर्क अभियानांतर्गत चार गावांमध्ये शाखेचे उद‌्घाटन

या शिवसंपर्क अभियान अंतर्गत ढेकू, सारबेटे, हेडावे, पळासदडे या चार गावांमध्ये शाखा उद्घाटन व सभासद नोंदणी करण्यात आली.

या कार्यक्रमास सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ व जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुकाप्रमुख विजय पाटील, उपतालुकाप्रमुख शिवकुमार पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख देवेंद्र देशमुख, संजय पवार, सरपंच नाना वाघ उपस्थित होते.

याप्रसंगी गुलाबराव वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहेत. अजूनही ज्या लोकांच्या समस्या असतील, त्या समस्या घेऊन आम्ही उद्धव ठाकरेंना भेटणार आहोत. या संपर्क अभियानांतर्गत जनतेशी संवाद साधून जनतेच्या अडीअडचणी समजून घ्या व कोरोनाचे नियम पाळून शिवसैनिकांना जनतेची सेवा करावी, असा आदेश त्यांनी आम्हाला देऊन जनतेपर्यंत पाठवले आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Inauguration of branches in four villages under Shiv Sampark Abhiyan