शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी नियंत्रण जनजागृती चित्ररथाचे सदाभाऊ खोत यांच्याहस्ते उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 13:44 IST

कृषी विभाग व कावेरी सिड्स यांच्या संयुक्त विद्ममाने कापूस पिकावरील गुलाबी व शेंदरी बोंड अळीच्या निवारण व नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे.

जळगाव - कृषी विभाग व कावेरी सिड्स यांच्या संयुक्त विद्ममाने कापूस पिकावरील गुलाबी व शेंदरी बोंड अळीच्या निवारण व नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या जनजागृती रथाचा शुभारंभ राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. तत्पूर्वी 72 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खोत यांच्याहस्ते करण्यात आले.      जिल्ह्यात गतवर्षी कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात गुलाबी व शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. यावर आतापासूनच नियंत्रण यावे याकरीता कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असून या चित्ररथाचे उद्घाटन येथील कृषी विभाग कार्यालयाच्या आवारात आज ना. खोत यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापालिका आयुक्त्‍ चंद्रकांत डांगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषि अधिकारी गोरख लोखंडे यांचेसह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व विविध बी बीयाणे उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी ना. खोत यांनी जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयास भेट दिली. याप्रंसगी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी ना. खोत यांना चालू खरीप हंगामात जिल्ह्यातील पीकांची सद्यपरिस्थिती तसेच उपलब्ध खते, बी बीयाणे व इतर बाबींची माहिती दिली. तसेच ना. खोत यांच्या हस्ते जिल्ह्यातील निवडक शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचून या योजनांचा लाभ नागरीकांना मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन ना. सदाभाऊ खोत यांनी केले. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Independence Dayस्वातंत्र्य दिवसJalgaonजळगाव