शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरमध्ये पुन्हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, खडसेंचे सेना आमदारावर गंभीर आरोप, म्हणाले, 'हा तर जातीयवाद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 23:31 IST

Eknath Khades News: आपण मंजूर करुन आणलेल्या २१७ कोटी रुपयांच्या कामांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करुन स्थगिती मिळविली आहे.  हा एक प्रकारचा जातीयवाद आणि करंटेपणा आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला.

जळगाव -  आपण मंजूर करुन आणलेल्या २१७ कोटी रुपयांच्या कामांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करुन स्थगिती मिळविली आहे.  हा एक प्रकारचा जातीयवाद आणि करंटेपणा आहे, अशा जोरदार शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

शुक्रवारी सायंकाळी मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, आमदारांनी विशेषतः माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  आपण २१७ कोटी रुपयांची कामे मतदारसंघात मंजूर करून आणली आहेत. यातील काही कामे मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील आहेत. काही कामे मंज़ूर तर काही प्रस्तावित आहेत.

आमदार पाटील हे आपण शिवसेनेचे आमदार आहोत,  असे जाहीर सांगत असतात. त्यांनी विधान मंडळांमध्ये किंवा जिल्हाधिकार्‍यांकडे साध्या दोन ओळीचे पत्र लिहून मी शिवसेनेचा आमदार आहे, असे सांगावे.  स्पर्धा विकासाची करा, आपण २०० कोटी आणले तुम्ही ५०० कोटी आणून दाखवा. मंजूर कामांना स्थगिती आणायचा करंटेपणा करू नका. या मतदारसंघात अधिकारी यायला तयार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण पाच पूल करून दाखवले आमदार पाटील यांनी  किमान शेमळदा येथे तापी नदीवरील आश्वासन दिलेला एक पूल करून दाखवावा, आव्हानही खडसे यांनी आमदारांना दिले आहे. ही तर खडसेंची धूळफेक केवळ पाच कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती मिळाली आहे. २१७ कोटी रुपयांच्या कामांना स्थगितीचा आरोप म्हणजे खडसे यांची निव्वळ धूळफेक आहे.  ग्रामविकास मंत्रालयाकडून मंजूर झालेला निधी नगरपंचायत हद्दीत खर्च करणार कसा? तोच निधी परत गेला आहे.  त्यामुळे जातीयवादीपणाचा आरोप धादांत खोटा आहे.  तुमच्याप्रमाणेच आपणही महाविकास आघाडीचा घटक आहोत. त्यामुळे खडसे यांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये.- आमदार चंद्रकांत पाटील 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना