ट्रॉलीने कट मारला, मजुराचा पंजा निकामी; कामावर जाताना अपघात
By विजय.सैतवाल | Updated: August 25, 2023 19:57 IST2023-08-25T19:57:26+5:302023-08-25T19:57:31+5:30
नशिराबाद येथील हनिफ शहा अमन शहा (२४) हे इमारत बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करतात.

ट्रॉलीने कट मारला, मजुराचा पंजा निकामी; कामावर जाताना अपघात
जळगाव : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे बांधकामाच्या ठिकाणी कामासाठी जात असलेल्या दोन जणांच्या दुचाकीला ट्राॅलीने कट मारल्याने दुचाकीस्वार खाली पडून गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील बिबानगरजवळ घडली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका जणाच्या हाताचा पंजा निकामी झाला.
नशिराबाद येथील हनिफ शहा अमन शहा (२४) हे इमारत बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करतात. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ते दुचाकीने (क्र. एमएच १९, डीक्यू ५३८६) पाळधी येथे कामावर जाण्यासाठी रहेमान गुलाब शहा यांच्यासह निघाले होते. त्या वेळी मागून येणाऱ्या ट्रालाने त्यांना कट मारला. त्यामुळे दुचाकीवरील हनिफ शहा आणि रहेमान शहा हे खाली पडले व दोघेही जखमी झाले. यात रहेमान शहा यांच्या उजव्या हाताचा पंजा निकामी झाला. त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.