‘सुधारित आरत्या’.............. पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:16 IST2021-07-26T04:16:12+5:302021-07-26T04:16:12+5:30
मोठे वाघोदे, ता. रावेर : साहित्यिक व सावदा येथील ना. गो. पाटील विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक वसंत पुरुषोत्तम ...

‘सुधारित आरत्या’.............. पुस्तकाचे प्रकाशन
मोठे वाघोदे, ता. रावेर : साहित्यिक व सावदा येथील ना. गो. पाटील विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक वसंत पुरुषोत्तम होले यांच्या ‘सुधारित आरती’.............. या स्वलिखित पुस्तकाचे प्रकाशन २४ रोजी गुरुवर्य वैकुंठवासी जगन्नाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी संतांच्या हस्ते पार पडले.
प्रा. होले यांनी प्रास्ताविक केले. आज सर्वजण पारंपरिक पद्धतीने तसेच शाब्दिक भाषेचा ताळमेळ नसताना सर्वजण भगवंत नामस्मरणासाठी आरती म्हणतात, मात्र आरती करताना अनेक शब्द, उच्चार चुकीचे बोलले जातात, असे भाविकांकडून होऊ नये म्हणून सुधारित आरती संग्रह करून भाविकांकडून आरती म्हणताना होणाऱ्या चुका व त्यांच्या दुरुस्त्या करण्यासाठी पुस्तक सर्वसामान्य भाविकांना उपयुक्त असून, भाविकांना विनामूल्य देणार असल्याचे सांगितले.
जगन्नाथ महाराज समाधी व मंदिराचे गादीपती धनराज महाराज अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
कार्यक्रमास सावदा येथील डॉ. व्ही. जे. वारके, स्वामिनारायण मंदिराचे स्वामी तसेच हिंदू जनजागृती अभियानाचे धोंडू माळी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, राजेंद्र वानखेडे, भारंबे यांच्यासह पंचक्रोशीतील वारकरी माळकरी व टाळकरी उपस्थित होते.