समितीने नोंदविलेले महत्त्वाचे निष्कर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:22+5:302021-08-21T04:21:22+5:30
कंपनीस दंडाबाबत शिफारस २ लक्ष्मी सर्जिकल यांनी दिलेल्या चलनमध्ये व प्रत्यक्ष दिलेल्या व्हेंटिलेटर सिरिअल नंबरमध्ये तफावत आढळून आली आहे. ...

समितीने नोंदविलेले महत्त्वाचे निष्कर्ष
कंपनीस दंडाबाबत शिफारस
२ लक्ष्मी सर्जिकल यांनी दिलेल्या चलनमध्ये व प्रत्यक्ष दिलेल्या व्हेंटिलेटर सिरिअल नंबरमध्ये तफावत आढळून आली आहे.
३ कॉम्प्रेसर हे ॲडल्ड व्हेंटिलेटर करीता बीआयएस प्रमाणपत्र अपेक्षित होते. तर पेडियाट्रीक व्हेंटिलेटर साठी यूएस एफडिए प्रमाणपत्र
अपेक्षि होते. त्याऐवजी दुसरे शिक्के आढळून आले.
४ हुमीडीटीफायर, कॉम्प्रेसर पार्टची किंमत टाकलेली नाही.
५ प्रोडक्टचे सट्रीफिकेशन नाही, सट्रीफिकेशन नंबर व तारीख नाही, गुणवत्ता व्यवस्थापन मानक, विद्युत सुरक्षा मानक नाही.
६ डबल लंग्स व्हेंटिलेशन सुविधा नाही
७ डिस्प्ले साईज १८ इंज अपेक्षित असताना ७ इंच आढळली
८ बॅकअप २ तासांचा अपेक्षित असताना १ तासांचा आढळून आला.
लक्ष्मी सर्जिकलकडून झालेल्या अन्य खरेदीचे काय?
व्हेंटिलेटर प्रकरणात पुरवठादार लक्ष्मी सर्जिकलने दिलेले व्हेंटिलेटर व हव्या असलेल्या व्हेंटिलेटरच्या स्पेसिफिकेशनमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. मुळात कंपनीच बदलण्यात आली होती. या प्रकरणात तक्रार झाल्यानंतर हा मोठा घोटाळा समोर आला आहे. आता याच लक्ष्मी सर्जिकलला कोट्यवधी रुपयांच्या निविदा कशा मिळतात, असा प्रश्न दिनेश भोळे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून झालेल्या मॉड्यूलर ओटी रुम, लेबर रुम, एअर फ्लो लॅमिनर या बाबींची खरेदी करण्यात आली आहे. गरज नसताना खरेदी व ज्या ठिकाणी गरज नाही, त्या ठिकाणी अद्यावत शस्त्रक्रिया कक्ष बनविण्यात आले आहेत. याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भोळे यांनी केली आहे.