लाड कमिटीच्या शिफारशी सफाई कर्मचाऱ्यांसाठी लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST2021-01-19T04:19:28+5:302021-01-19T04:19:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लाड कमिटीने सफाई कर्मचाऱ्यांचा वारसांना नोकरी देण्याची शिफारस केली होती. २०१५ मध्ये या कमिटीने ...

Implement the recommendations of the Lad Committee for the cleaning staff | लाड कमिटीच्या शिफारशी सफाई कर्मचाऱ्यांसाठी लागू करा

लाड कमिटीच्या शिफारशी सफाई कर्मचाऱ्यांसाठी लागू करा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लाड कमिटीने सफाई कर्मचाऱ्यांचा वारसांना नोकरी देण्याची शिफारस केली होती. २०१५ मध्ये या कमिटीने लागू केलेल्या सर्व शिफारशींसह तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू करण्याचा शासन निर्णय दिला होता. मात्र, जळगाव महापालिकेत या शिफारसी अजूनही लागू करण्यात आल्या नसून, त्या तत्काळ लागू करा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश कामगार आघाडीच्या सहसंयोजक डॉ. रेखा बहनवाल यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

भाजपच्या प्रदेश कामगार आघाडीच्या सहसंयोजक डॉ. रेखा बहनवाल या सोमवारी जळगाव शहराच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यामध्ये त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्नावर मनपा आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर मनपा स्थायी समिती सभापतींच्या दालनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर आदी उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत असून, मनपाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे यावी, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे केली असल्याची माहिती डॉ. बहनवाल यांनी दिली. मनपाचा आकृतिबंधदेखील मंजूर नसल्याने बहनवाल यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Implement the recommendations of the Lad Committee for the cleaning staff