मनपा कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST2021-03-28T04:15:28+5:302021-03-28T04:15:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - महानगरपालिकेत मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नसून मनपा प्रशासनाकडून यासाठी वारंवार ...

Implement 7th pay commission for municipal employees | मनपा कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करा

मनपा कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - महानगरपालिकेत मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नसून मनपा प्रशासनाकडून यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नुकतेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या काही दिवसात कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे.

मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे परंतु अद्यापही त्यांची मागणी मान्य करण्यात आलेली नाही. महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी याबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. महापौरांनी शासनाला पत्र देखील पाठविले असून येत्या काही दिवसात त्यांची मागणी मान्य होणार आहे. मनपा कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळेल अशी आशा महापौरांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Implement 7th pay commission for municipal employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.