पाळधी, ता. धरणगाव : येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये अभियंता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त ८ वी ते १० तील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रयोग सादर केले.
ए.टी. बारी, तुषार बागुल, अनंत पाटील, धीरज पाटील यांना ‘इम्पिरियलस सर एम विश्वेश्वरया अवाॅर्ड’ने संस्थेचे अध्यक्ष इंजि. नरेश पी. चौधरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच या वेळी नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनानिमित्ताने, शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे शिक्षक पी.यू. पाटील, वाय.पी. पाटील, हेमराज पाटील, पद्माकर पाटील, अरुण कुमार चौधरी यांना ‘इंपेरिअल्स शिक्षण महर्षी अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
सूत्रसंचालन शाळेचे प्राचार्य महेश कवळे यांनी केले, या कार्यक्रमास समन्वयक गजानन पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपास्थित होते.