सोशल मीडियावर शेतकरी संपाची धग

By Admin | Updated: June 2, 2017 16:36 IST2017-06-02T16:36:40+5:302017-06-02T16:36:40+5:30

संपाचे समर्थन आणि विरोधावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

The impact of the farmers on social media | सोशल मीडियावर शेतकरी संपाची धग

सोशल मीडियावर शेतकरी संपाची धग

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.2 - अन्नदाता शेतकरी हा संकटात असताना शासन आणि प्रशासनाकडून होणा:या दुर्लक्षामुळे संपासारखा टोकाचा निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावर शेतकरी संपाच्या समर्थनार्थ आणि विरोधात चर्चा रंगत आहे.  ‘मी शेतकरी, किसान क्रांती’ चे लोगो विविध व्हॉटस् अप ग्रुपच्या डीपीवर लावून समर्थन केले जात आहे.
शेतक:यांच्या मागण्यांकडे शासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने शेतक:यांनी 1 जूनपासून संप पुकारला आहे. दोन दिवसांपासून शेतक:यांनी भाजीपाला व दुधाची शहरात होणारी विक्री थांबविली आहे.
 
होय मी जाणार संपावर..भावनिक आवाहन
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज उपाशी आहे. माङयाकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडे वेळ नाही.. अशी भावनिक पोस्ट टाकत 1 जूनपासून सुरू झालेल्या शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी भावनिक आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे किसान क्रांतीचा फोटो डीपीवर ठेवण्यासाठी भावनिक आवाहन केले जात आहे.
 
शेतकरी संपाला विरोधाची धार
शेतक:यांचा संप हा राष्ट्रवादीचा डाव असल्याचा आरोप करीत त्याला विरोध करण्यात येत आहे. राज्यातील 95 सहकारी साखर कारखाने तसेच सहकारी सूतगिरणी व अन्य उद्योग तसेच एफआरपीची थकीत रक्कम ही 75 हजार कोटींच्या घरात आहे. या सर्व संस्था राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ताब्यात आहे. ही रक्कम महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या 40 टक्के इतकी आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसने शेतक:यांची ही रक्कम थकीत ठेवत शेतक:यांची दिशाभूल सुरू केल्याचा आरोप होऊ लागला आहे.
सरसकट कजर्माफी म्हणजे नियमित करदात्यांमध्ये असंतोष
शासनाने शेतक:यांना सरसकट कजर्माफी दिल्यास नियमित कर भरणा:यांमध्ये मोठय़ा प्रमाणात असंतोष निर्माण होईल. त्यासोबतच प्रामाणिकपणे कर्ज भरणा:या शेतक:यांच्या मनातदेखील असंतोषाची भावना निर्माण होईल. अन्य व्यवसायात उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण होण्याची शक्यता संपाला विरोध व्यक्त करताना वर्तविली आहे.
 
जपानमधील संपाचा बोध घेण्याचा सल्ला
शेतकरी संपादरम्यान दूध रस्त्यावर फेकून आंदोलन केले जात आहे. सोशल मीडियावर अन्नाच्या नासाडीला विरोध करीत जपानमध्ये करण्यात येणा:या संपाचा बोध घेण्याचा सल्ला शेतक:यांना देण्यात येत आहे. जपानमध्ये बूट तयार करण्याच्या कंपनीत कामगारांनी संप पुकारला होता. संपकाळात  कर्मचा:यांनी एकच बूट तयार करीत निषेध नोंदविला होता. त्यानुसार शेतक:यांनी दूध रस्त्यावर न फेकता त्यापासून दही, पनीर, तूप व लोणी हे पदार्थ तयार करून संप मिटल्यानंतर विक्री करण्याचा सल्ला दिला आहे.
 
शेतकरी संपाच्या निमित्ताने कोकणातील ‘खोत पद्धतीला’ उजाळा
शेतक:यांचे शोषण करणारी खोत पद्धत कोकणात अस्तित्वात होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी खोत पद्धत नष्ट करण्यासाठी लढा दिला होता. 1905 ते 1931 या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा या ठिकाणी अनेक सभा घेतल्या होत्या. खोत पद्धतीविरोधात शेतक:यांनी 1933 ते 1939 या काळात 14 गावांतील शेतक:यांनी संप पुकारला होता.
 
सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
शेतक:यांना कजर्माफी नाकारणा:या राज्य शासनावर सोशल मीडियावर शेतकरी व शेतकरीपुत्रांकडून संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे सरकारच्या समर्थनार्थ शेतक:यांची अवस्था ही विरोधकांमुळेच असल्याचे आकडेवारीसह दाखले दिले जात आहे. 40 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीने शेतक:यांसाठी काय केले असा सवाल सरकारच्या समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title: The impact of the farmers on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.