शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

पावसाच्या दडीने जळगावच्या बाजारात मुगाच्या आवकवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 10:57 IST

गहू, तांदूळ, डाळीचे भाव स्थिर

ठळक मुद्देडाळींचा दिलासा८ ते १० दिवसात होणार चित्र स्पष्ट

जळगाव : जळगावच्याबाजारपेठेत उडीदाची आवक सुरू झाली असून मुगाच्या आवकवर मात्र पावसाच्या दडीने परिणाम झाला आहे. शेवटच्या टप्प्यात पावसाची आवश्यकता असतानाच गेल्या २१ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मूग उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढण्यासह बाजारपेठेतही त्याचा परिणाम जाणवणार असल्याचे चिन्ह आहे. दरम्यान, गहू, तांदूळ, डाळ यांची मागणीनुसार पुरेसी आवक असल्याने आठवडाभरापासून त्यांचे भाव स्थिर आहे.सप्टेंबर महिन्यापासून बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू होते. मात्र मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने मुगाच्या शेंग्या भरण्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पिकाच्या उताºयावरही परिणाम होणार आहे. पुढील आठवड्यापासून आवक वाढण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी पावसामुळे होणारा परिणाम बाजारातही जाणवणार असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. जळगावच्या बाजारपेठेत जळगाव, धरणगाव तालुक्यासह अहमदनगर, चिखली, मेहकर, अकोला या भागातून मुगाची आवक होते. मात्र यंदा अद्यापही दरवर्षाच्या तुलनेत आवक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भावावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे थोड्याफार प्रमाणात उडीदाची आवक सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, कर्नाटकातून थोडीफार नवीन उडीदाची आवक सुरू आहे. जळगावात दररोज २०० क्विंटल उडीदाची आवक सुरू असून मूग मात्र केवळ ५० क्विंटलच्या जवळपास येत आहे.८ ते १० दिवसात होणार चित्र स्पष्टभाद्रपद महिना सुरू होताच उन्हाचाही चटका वाढला असून उडीद-मुगाची आवक वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या उडीदाचा ३५०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल भाव असून मुगाला ३८०० ते ४६०० रुपये भाव मिळत आहे. कर्नाटकमधून येणाºया चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ५००० रुपये प्रती क्विंटलपर्यंत आहेत. मात्र येता ८ ते १० दिवसात आवक व भावाचे खरे चित्र स्पष्ट होईल, असे जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी सांगितले.गहू, तांदूळ स्थिरमागणीनुसार धान्याची आवक सुरू असल्याने धान्य व डाळींचे भाव स्थिर आहेत. १४७ गहू २४०० ते २५०० रुपयांवर स्थिर असून लोकवन गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये, शरबती गहू २५०० ते २६०० रुपये आणि चंदोसीचे भाव ३६०० ते ३८०० रुपयांवर स्थिर आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे. तांदुळाचे भावदेखील स्थिर आहेत.डाळींचा दिलासाबाजारात उडीदाची आवक सुरू झाली असून पुढील आठवड्यात ती वाढण्याची शक्यता आहे. मुगाची आवक कमी असली तरी डाळींचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांना तेवढा दिलासा आहे. बाजारपेठेत मुगाची डाळ ६६ ते ७० रुपये प्रती किलोवर स्थिर असून उडीद डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलो, तूरडाळ - ५६ ते ६० आणि हरभरा डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव