अमळनेरला शांततेत गणेश विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST2021-09-15T04:21:03+5:302021-09-15T04:21:03+5:30
बॅण्ड, डीजे, गुलालविरहीत सार्वजनिक मिरवणुकीशिवाय गणेश विसर्जन करण्यात आले. पाचव्या दिवशी दहा मंडळे व ५०० खासगी अशा ...

अमळनेरला शांततेत गणेश विसर्जन
बॅण्ड, डीजे, गुलालविरहीत
सार्वजनिक मिरवणुकीशिवाय गणेश
विसर्जन करण्यात आले. पाचव्या
दिवशी दहा मंडळे व ५०० खासगी
अशा ५१० गणपती मूर्तींचे शांततेत
विसर्जन करण्यात आले.
बोरी नदीला पूर आला असून,
नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रशांत
सरोदे व उपमुख्याधिकारी संदीप
गायकवाड यांनी १३ मूर्ती संकलन केंद्रे
व त्यासाठी ५ ट्रॅक्टर ठेवले होते. फरशी
पुलावर तेल्या मारुती मंदिराजवळ
तसेच मंगळ ग्रह मंदिराजवळ,
गोशाळेजवळ पालिकेचे आरोग्य
निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष
बिऱ्हाडे, अरविंद कदम, संतोष
संदानशीव, फारुख शेख, सोमनाथ
संदानशीव यांनी लहान मुलांच्या तथा
मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी
मूर्ती संकलित करून स्वतः विसर्जन
केले.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,
एपीआय मच्छिंद्र दिवे, गंभीर शिंदे,
नरसिंग वाघ, शत्रुघ्न पाटील, गोपनीय
शाखेचे अंमलदार शरद पाटील,
हितेश चिंचोरे, आरसीपी प्लाटून,
होमगार्ड यांनी ठिकठिकाणी बंदोबस्त
ठेवला होता. लहान मुलांना तसेच
मंडळ कार्यकर्त्यांना पाण्यात उतरू
दिले जात नव्हते.
फोटो : १५ एचएसके ०३
मूर्ती विसर्जन करताना पालिकेचे
कर्मचारी (छाया : अंबिका फोटो)