शाळांमध्ये पाचदिवसीय बाप्पांचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST2021-09-16T04:21:15+5:302021-09-16T04:21:15+5:30
जळगाव : शहरातील विविध शाळांमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात मंगळवारी पाचदिवसीय गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात ...

शाळांमध्ये पाचदिवसीय बाप्पांचे विसर्जन
जळगाव : शहरातील विविध शाळांमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात मंगळवारी पाचदिवसीय गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी स्तोत्रपठण तसेच गीतगायन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
महाराणा प्रताप विद्यालय
प्रेमनगर येथील महाराणा प्रताप महाविद्यालयातील हरित सेनामार्फत पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांचे शालेय परिसरात विसर्जन करण्यात आले़ याप्रसंगी मुख्याध्यापक डी. एस. पाटील, पर्यवेक्षक डी. बी. सोनवणे, समिधा सोवनी, एस. जी. चौधरी, मायाश्री पाटील, विष्णू साबळे, ऋषिकेश पाटील, आदींची उपस्थिती होती.
००००००००००
विद्या इंग्लिश मीडियम स्कूल
विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाचदिवसीय गणेशाचे पर्यावरणपूरक व भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात पाण्याच्या टाकीमध्ये गणेशमूर्तींना भक्तिभावाने निरोप देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक हॅरी जॉन, प्रशासिका कामिनी भट यांच्या हस्ते आरती करण्यात आली. ढोलपथकाकडून गजर करण्यात आला. याप्रसंगी शिक्षकांची उपस्थिती होती.
०००००००००००
मानव सेवा विद्यालय
मानव सेवा विद्यालयात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्तोत्रपठण, चित्रकला, गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. चित्रकला स्पर्धेत सुमित खरे प्रथम, नेहा लिंडाईत द्वितीय, तर रूपेश पाटील तृतीय तसेच गीतगायनमध्ये राधिका सुतार, तर स्तोत्रपठणामध्ये मानस सोनवणे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विसर्जनप्रसंगी मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, मुक्ता पाटील यांची उपस्थिती होती.