बोदवड उपसाचे काम त्वरित सुरू करा
By Admin | Updated: May 3, 2017 17:06 IST2017-05-03T17:06:06+5:302017-05-03T17:06:06+5:30
शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बोदवड उपसाचे काम त्वरित सुरू करा
जळगाव,दि.3- बोदवड उपसा सिंचन योजनेच्या कामाला त्वरित सुरुवात करा या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
बोदवड परिसर सिंचन योजना 2009-10 मध्ये मंजूर झाली आहे. योजनेचे भूूमिपूजन झाल्यानंतर केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी 500 कोटींचा निधीही मंजूर झाला होता. 2015-16 र्पयत या प्रकल्पाचे काम पूर्ण करावे असे आदेशही केंद्राने त्यावेळी दिले होते. मात्र अद्याप या सिंचन योजनेच्या कामाला सुरुवातही नाही. त्यामुळे बोदवड परिसरातील शेतक:यांसह शेतकरी संघटनेचे पदाधिका:यांतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटना अध्यक्ष अनिल धनवट, महिला आघाडीच्या अध्यक्षा गीताबाई नरवाडे, दगडू शेळके, मधुकर पाटील, पुरुषोत्तम पाटील, नाना पाटील, संतोष पाटील, संदीप चिंचोले, राजेंद्र चौधरी, गोपीचंद सुरवाडे चंद्रकांत सोनवणे आदींचा समावेश होता.