अग्निशमन करासाठी आयएमएचा आता उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST2021-02-05T06:01:15+5:302021-02-05T06:01:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका अग्निशमन कराच्या नावाखाली खासगी रुग्णालयांची पिळवणूक करीत असून तातडीने हे सर्व थांबले नाही, ...

IMA warns of hunger strike | अग्निशमन करासाठी आयएमएचा आता उपोषणाचा इशारा

अग्निशमन करासाठी आयएमएचा आता उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिका अग्निशमन कराच्या नावाखाली खासगी रुग्णालयांची पिळवणूक करीत असून तातडीने हे सर्व थांबले नाही, विस्तृत माहिती मिळाली नाही तर लवकरच आयएमएचे डॉक्टर महापालिकेसमोर उपोषणाला बसतील, अशी माहिती सचिव डॉ. स्नेहल फेगडे यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत गुरुवारी जनता दरबारात उपमहापौर सुनील खडके यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे.

यानुसार महापालिकेने खासगी रुग्णालयांसाठी लावण्यात आलेल्या अग्निशमन कराविषयीचा शासन निर्णयाची प्रत वारंवार मागूनही दिली जात नाही. यासह महापालिकेने अग्निशमन सेवा वार्षिक शुल्क ठराव ९३० हा रद्द करण्यात आलेला आहे, त्यानुसार वार्षिक शुल्क रद्द करावे, एनओसीची अट रद्द करावी, त्याऐवजी अग्निशमन संस्थाकडून बी फार्म पुरेसे असावेत, अशी मागणी या तक्रार अर्जात करण्यात आली आहे.

Web Title: IMA warns of hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.