शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारमधून अवैध तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 21:17 IST

पोलिसांची कारवाई : २० लाखाची कार व ४० हजाराच्या मद्यासह एकाला अटक

जळगाव : मद्य विक्रीचे दुकान उघडताच ४० हजार रुपयांची विदेशी दारु घेऊन त्याची २० लाखाच्या अलिशान कारमधून अवैधरित्या वाहतूक करताना सैय्यद मुन्ना सैय्यद बाबुमन्नु (५५, रा.जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी दुपारी इच्छादेवी चौकात पकडले. कार व मद्यसाठा जप्त करण्यात आला असून मद्यविक्री करणारा दुकानदार व ज्याच्याकडे मद्य जात होते, अशा दोघांना आरोपी केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याच पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात लॉकडाऊन काळात अवैध मद्य तस्करी प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात पोलिसांवरच कारवाईची कुºहाड कोसळली. लॉकडाऊनमध्ये शिथीलता येताच पुन्हा अवैध मद्य तस्करीचे प्रकरण घडले.एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे यांना चारचाकीतून मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत, निलेश पाटील, सचिन पाटील यांच्या पथकाला सूचना केल्या. माहितीनुसार पथक ईच्छादेवी चौफुलीवर थांबले असता काळ्या रंगाची अलिशान महागडी कार (क्र.एम.एच १९ सी.व्ही.१०) पोलिसांच्या नजरेस पडली. पथकाने चालकाला मास्क का लावले नाही अशी विचारणा केली व त्यानंतर तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीत विदेशी दारु तसेच बियरच्या बाटल्याचे खोके दिसून आले. चालक चालक सैय्यद मुन्ना याची चौकशी केली असता, त्याच्याकडे दारु पिण्याबाबत तसेच मद्य वाहतुकीबाबत कुठलाही परवाना नव्हता.त्यानुसार पथकाने कारवाई करुन वाहन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आले. चौकशीत चालक सैय्यद याने हे मद्य हे आदर्श नगर येथील विजय वाईन येथून मालक मुफद्दर अली हुसने अमरेलीवाला रा. आदर्श नगर यांच्याकडे घेवून जात असल्याचे सांगितले. याप्रकरणी विजय नेरकर यांच्या फिर्यादीवरुन अवैध मद्य तस्करी केल्याप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला असून चारचाकी तसेच मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. चालकाने कोरोनापासून बचावासाठी तोंडाला कुठलेही मास्क लावलेले नसल्याने कलम १८८ प्रमाणेही कारवाई करण्यात आली आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्गJalgaonजळगाव