अकलूद येथे अवैध दारू जप्त
By Admin | Updated: May 4, 2017 13:00 IST2017-05-04T13:00:43+5:302017-05-04T13:00:43+5:30
पोलिसांनी केली हॉटेलमालकासह मॅनेजरला अटक
अकलूद येथे अवैध दारू जप्त
फैजपूर, ता़ यावल,दि.4 - विना परवाना मद्याचा साठा बाळगल्याप्रकरणी अकलूद येथील हॉटेल किनाराचे मालक हेमंत पृथ्वीराज फालक (48, विठ्ठल मंदिर वॉर्ड, भुसावळ) व मॅनेजर गोपाळ पंडीत कोळी (अकलूद, ता़यावल) यांना अटक करण्यात आली़ हॉटेल किनाराच्या तपासणीनंतर पोलिसांनी 94 हजार 959 रुपयांच्या बिअरसह विदेशी दारू जप्त केली तसेच 20 हजार 200 रुपयांची रोकडही पोलिसांनी ताब्यात घेतली़ या प्रकरणी हॉटेल चालकासह मालकाविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला़
दरम्यान, भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल हे फैजपूर येथे गस्तीवर जात असताना त्यांना हॉटेल उघडी दिसल्याने त्यांनी कर्मचारी संकेत झांबरे व चालक विशाल सपकाळे यांना तपासणीचे आदेश दिल्यानंतर अवैधरित्या मद्याचा साठा सापडला़