शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

अवैध गोवंश वाहतुकीचा ट्रक खड्ड्यात सोडून चालक पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 17:28 IST

कर्जोदजवळील घटना : गोवंशप्रेमींनी पाठलाग केल्याने २० गुरांची सुटका, क्लिनरला पकडले

रावेर : मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरकडून रावेरच्या दिशेने भरधाव वेगात अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या मिनीट्रकची (एम पी - ०८ /जीए १६७९) भनक अज्ञात गोवंशप्रेमींना  लागल्याने त्यांनी सदरील वाहनावर दगडफेक करीत पाठलाग केल्याने,  या चालकाने कर्जोद फाट्यावरील वळणावर हा मिनीट्रक रस्त्याच्या कडेला खोल  खड्ड्यात उतरवून पलायन केले. तथापि, जमलेल्या संतप्त जमावाने कडब्याच्या गंजीत दडलेल्या क्लिनरला बाहेर काढून पोलीसांच्या स्वाधीन केले.  ही घटना दि २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेेच्या सुमारास घडली. रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला व कत्तलीसाठी जाणार्‍या २० गोवंशातील गोर्‍ह्यांची सुटका करण्यात यश प्राप्त झाले असून  सव्वा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे  फौजदार मनोज वाघमारे, पोहेकॉ तडवी, राठोड, पोना नितीन डामरे ,पो कॉ मंदार पाटील, पोकॉ पुरूषोत्तम पाटील आदी सहकारी व दंगा नियंत्रण पथकाचे प्लाटून घेवून घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने सदर मिनीट्रक खोल दरीतून बाहेर काढून रावेरकडे मार्गस्थ केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळून, कत्तलीसाठी जाणार्‍या सव्वा पाच लाख मतीचे २०  गोवंशातील गोर्‍हयांची सुटका करून त्यांची रवानगी थेट कुसूंबा येथील बाफना गोशाळेत रवानगी करण्यात आली. दरम्यान, पाच लाख रुपये         किमतीचा मिनीट्रक जप्त करण्यात आला आहे.