शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनांकडे सपशेल दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:27 IST

फवारणी होईना

ठळक मुद्देदिवसागणिक वाढतेय रुग्ण संख्याडेंग्यू नियंत्रणासाठी ७२ कर्मचारी

जळगाव : शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दररोज आहे. जिल्हाधिकारी, महापौरांचे बंधू, उपमहापौर यांना डेंग्यू झाल्यानंतरही आरोग्य यंत्रणेला जाग येत नसल्याचे चित्र शहरात आहे. पाच लाख लोकसंख्येच्या शहरासाठी केवळ ७२ कर्मचाऱ्यांवर डेंग्यू नियंत्रणाची जबाबदारी आहे. तसेच धूर फवारणीसाठीदेखील केवळ १४ मशीन असल्याने शहरातील बहुतांश भागात फवारणी होतच नसल्याचे चित्र आहे.शहरात गेल्या दोन महिन्यापासून डेंग्यू व इतर आजारांनी मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यातच पावसामुळे घराशेजारी तसेच इतरत्र साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत आहे. सध्यादेखील दररोज तीन ते चार डेंग्यूचे रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खाजगी रुग्णालयांमध्ये लहान मुलांसह महिला, तरूण, वृद्ध यांना डेंग्यूची लागण असून असे जवळपास ४०च्यावर डेंग्यूचे रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली.प्रचंड अस्वच्छताशहरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढिग साचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल परिसरात तर प्रचंड घाण झाली आहे. कचºयाचे ढीग साचले आहेत. याबाबत तक्रार करुनही उपयोग होत नाही.फवारणी नाहीडेंग्यूच्या नियंत्रणासाठी मनपाच्या पथकात २४ कायम कर्मचारी असून ७२ इतर कर्मचारी देण्यात आले आहेत. मात्र कायम कर्मचाºयांपैकी दररोज सरासरी २० कर्मचारी तर इतर ७२ पैकी ५२ कर्मचारी कामावर असतात. प्रत्यक्षात २०० मजुरांची आवश्यकता असताना केवळ ७२ कर्मचाºयांवर डेंग्यू नियंत्रणाची जबाबदारी मनपाने दिली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या सोबतच १६ पैकी केवळ १४ धूर फवारणी मशीन सुरू असून एवढ्या मोठ्या शहरासाठी त्या कमी पडत असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी शहरातील दहा भागांची पाहणी केली असता एकाही भागात फवारणी झाली नव्हती.शहरात जागोजागी कचºयाचे ढीगशहरात डेंग्यूसह विविध आजार पसरत असतानाही शहरातील साफसफाईकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. जिल्हा क्रीडा संकुल परिसरासह अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले असून त्यामुळे डासांची संख्याही वाढत आहे. जिल्हाधिकारी, महापौरांचे बंधू, उपमहापौर यांना डेंग्यू झाल्यानंतरही मनपाने यातून काही धडा घेतला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे फवारणी होत नसताना किमान साफसफाई तरी व्हावी अशी मागणी होत आहे.ज्या भागात डेंग्यूची तक्रार येत आहे अथवा सूचना मिळत आहे त्या भागात नियमित फवारणी, अ‍ॅबेटिंग केले जात आहे.- एस.व्ही. पांडे, जीवशास्त्रज्ञ, आरोग्य विभाग, मनपा.डेंग्यूच्या नियंत्रणासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. यासाठी एक दिवस कोरडा दिवस पाळला पाहिजे. डासांची उत्पत्ती असणाºया ठिकाणी थोडे रॉकेल अथवा डिझेल टाकावे, पाणी व द्रव पदार्थाचे जास्त सेवन करावे.- डॉ. हेमंत पाटील, बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव