शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

फायर ऑडीटबाबत अनभिज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 22:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : भंडारा येथील नवजात शिशू कक्षात आग लागून १०शिशूंचा  जीव गेला. यानंतर पूर्ण राज्यभरातील दवाखान्यांमधील ...

ठळक मुद्देविभागातील बहुतांश रुग्णालयातील धक्कादायक स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : भंडारा येथील नवजात शिशू कक्षात आग लागून १०शिशूंचा  जीव गेला. यानंतर पूर्ण राज्यभरातील दवाखान्यांमधील आगीबाबतच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आगीची घटना घडल्यास तातडीने उपाययोजना करत्या याव्यात म्हणून रुग्णालयांमध्येही फायर ऑडीट करण्याचे निर्देश असतात.  याचे पालन होते की नाही, हे पाहिले असता भुसावळ विभागातील बहुतांश शासकीय रुग्णालयांमधील अधिकारी हे तर  फायर ऑडीटबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

बोदवडला केला अंदाज व्यक्तबोदवड  ग्रामीण रुग्णालयाच्या फायर ऑडीट  बाबत वैद्यकीय अधिकारी अमोल पवार यांची प्रतिक्रिया घेतली असता नव्यानेच चार्ज घेतला असून मार्च महिन्यात  कदाचित  ऑडीट  झाले असेल असे त्यांनी सांगितले.

यावल येथे आदेश नाहीत ....यावल ग्रामीण रुग्नालयास फायर ऑडीट  विषयी शासनाकडून कोणत्याही सुचना नसल्याने  ऑडीट  होत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी सांगीतले. 

भुसावळला माहितीच उपलब्ध नाहीभुसावळ  ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरला फायर ऑडीट बाबत माहितीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयूर नितीन चौधरी यांच्याशी संपर्क केला असता याबाबतची माहिती येथे उपलब्ध नसून ती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तर नगरपालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर यांना कोरोना झाल्याने माहिती मिळाली नाही.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळfireआगhospitalहॉस्पिटल