गावाचा विकास साधायचा असेल तर ग्रामपंचायतीचा कर १०० टक्के भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:52+5:302021-09-24T04:18:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुरंगी, ता. पाचोरा : गावाचा विकास साधायचा असेल तर सर्वप्रथम नागरिकांनी ग्रामपंचायतीचा कर वेळेवर भरला ...

If you want to develop the village, pay 100% Gram Panchayat tax | गावाचा विकास साधायचा असेल तर ग्रामपंचायतीचा कर १०० टक्के भरा

गावाचा विकास साधायचा असेल तर ग्रामपंचायतीचा कर १०० टक्के भरा

लोकमत न्यूज नेटवर्क

कुरंगी, ता. पाचोरा : गावाचा विकास साधायचा असेल तर सर्वप्रथम नागरिकांनी ग्रामपंचायतीचा कर वेळेवर भरला पाहिजे व ग्रामपंचायतींनीदेखील आपले उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत गावकऱ्यांना अधिकाधिक लोकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न करावा, तरच ग्रामीण भागाचा विकास साधत महाराष्ट्र पर्यायाने देश समृद्ध होईल, असे प्रतिपादन भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. आदर्श गाव पाटोदा गावाची राज्यभरात ख्याती असून, भास्करराव पेरे- पाटील यांनी ते समृद्ध केले आहे. ते तेथे सरपंच आहेत. कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते म्हणून ते बोलत होते.

पाचोरा तालुक्यातील खेडेगाव नंदीचे येथे कुरंगी बाबरूड गटाचे जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील यांच्या प्रयत्नातून खेडगाव नंदीचे येथे चार कोटी रुपयांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा झाला. आमदार किशोर पाटील, आमदार गिरीश महाजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, संजय पाटील, दीपकसिंग राजपूत, मधुकर काटे, पाचोरा प्रांत डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, आरोग्य अधिकारी डॉ. समाधन वाघ, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील, खेडगाव नंदीचे सरपंच स्वाती कुमावत, उपसरपंच भटेसिंग पाटील, संदीप संघवी, शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख किशोर बारावरकर, पंढरीनाथ पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, आमदार किशोर पाटील, डॉ. समाधान वाघ यांनी मनोगत व्यक्त केले

सूत्रसंचालन महेश कौडिण्य, प्रा. यशवंत पवार यांनी केले. यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, नंदीकेश्वर युवा मंडळाने परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन प्रवीण ब्राह्मणे यांनी केले.

Web Title: If you want to develop the village, pay 100% Gram Panchayat tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.