नियम पाळाल तर सॅल्यूट, मोडल्यास हय गय नाही : पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:55+5:302021-09-06T04:21:55+5:30
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, डीवायएसपी ...

नियम पाळाल तर सॅल्यूट, मोडल्यास हय गय नाही : पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, तालुक्याचे निरीक्षक विलास शेंडे यांच्यासह व्यापारी, प्रतिष्ठित व्यक्ती, गणेश मंडळाचे पदाधिकारी, डी. जे. संघटनेचे पदाधिकारी, महिला मंडळाचे सदस्य, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
शहर व बाजारपेठ व पोलीस हद्दीमध्ये जवळपास २०० मंडळांची गणेश मंडळाची स्थापना करण्यात येते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी फक्त ३५ मंडळांनी स्थापना केली होती. प्रशासनास सहकार्य करून साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला होता.
एक प्रभाग एक गणपती
शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकच मूर्ती बसण्याचा प्रयत्न करावा, असे यावेळी डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी शिर्डी, कोपरगावचे उदाहरण देताना सांगितले. मात्र ते शक्य न झाल्यास कमीत कमी एक प्रभाग एक गणपती या पद्धतीने तरी गणेशोत्सव साजरा करावा, अशा सूचना मंडळांना केल्या.
याबाबत नगरसेवक मुकेश गंजाळ यांच्यासह गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले
आणि डीजे संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीतून नाराजीने निघाले
कोरोना काळात बँकेकडून कर्ज घेऊन डीजे घेतले आहे, मात्र शासनाकडून डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षीसुद्धा कारण नसताना बळजबरीने घरी लावलेल्या डीजेसह वाहनांवर आरटीओने कारवाई करत लाखाचे दंड आकारले. यातून बेरोजगारीमुळे अनेकांनी आत्महत्यासुद्धा केल्या, आता तरी परवानगी द्यावी या नाराजीतून डीजे संघटनेचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी भरसभेत ३० ते ४० युवकांसह बैठकीतून काढता पाय घेतला मात्र, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी हॉलच्या बाहेर निघालेल्या युवकांची समजूत काढून पुन्हा हॉलमध्ये बोलविले.
आमदार संजय सावकारे यांनी मांडली डीजे संघटनेची बाजू
शहरात सुशिक्षित बेरोजगार असून त्यांनी कर्ज काढून डीजे व्यवसाय सुरू केला आहे. २० ते ३० हजार त्यांना महिन्याला हप्ता भरावा लागतो, कोरोनामुळे व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याकरिता शासनाने यातून डीजे साऊंडच्या तांत्रिक बाबीवर मधला मार्ग काढावा व यांची अडचण दूर करावी, अशी भूमिका आमदार संजय सावकारे यांनी पोलीस प्रशासनासमोर मांडली.
कुठलाही विषय हा संवादाच्या आदान प्रदानाने सोडवला जातो, मात्र डीजेचालकांनी फक्त त्यांचीच भूमिका मांडून नाराजी व्यक्त करून चालू बैठकीतून निघून जाणे हे योग्य नाही. तुमची बाजू ऐकून त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र पोलीस प्रशासनाची बाजू न ऐकताच निघून गेल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. डीजेचालकांची स्वतंत्र बैठक लावण्याचे सांगण्यात आले.
गावठी कट्टा व शस्त्र बाळगणाऱ्याची माहिती कळवा
येणारे सण उत्सव हे शांततेने साजरे करावे. शासनाच्या नियमाचा उल्लंघन करू नये. याशिवाय गावठी कट्टा यासह शास्त्र असल्याची माहिती कुणाकडेही उपलब्ध असल्यास पोलीस प्रशासनाला कळवावी. त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही डॉ. बी. जी. शेखर यांनी सांगितले.