स्त्री निसर्गतः अबला नसते तर ती घडविली जाते : प्रा. डॉ. वंदना पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:21+5:302021-09-07T04:20:21+5:30
अध्यक्षस्थानी निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी एच. टी. माळी होते. युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित विचार प्रबोधन अभियान अंतर्गत ‘महिला सक्षमीकरण पुरुष ...

स्त्री निसर्गतः अबला नसते तर ती घडविली जाते : प्रा. डॉ. वंदना पाटील
अध्यक्षस्थानी निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी एच. टी. माळी होते. युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित विचार प्रबोधन अभियान अंतर्गत ‘महिला सक्षमीकरण पुरुष मानसिकतेची भूमिका’ व ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ या दोन विषयावर १५ ते ३० या वयोगटासाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यात ३६ मुली व सात मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण येथील लायन्स-आयएमए हॉल येथे झाला. जी.एस. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक स.सु. बोरसे यांनी आवेशपूर्ण भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निबंध स्पर्धेचा निकाल असा : प्रथम - केतकी पुरुषोत्तम सोनवणे, द्वितीय- मयूरी मधुकर भोई तृतीय - कोमल शैलेश झाबक, कविता सुरेश पाटील, तर ऐश्वर्या संजय सोमवंशी, कल्याणी हेमंत महाजन, रितुजा संभाजी पाटील, वैष्णवी मच्छिंद्रनाथ पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. बक्षिसांचे प्रायोजक आशिष पवार, अनिता सिसोदे, शिरसाठ सर व योगेश पाटील होते. नीलेश शिवाजी पाटील यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. विशेष कार्य करणाऱ्या तिलोत्तमा रवींद्र पाटील,संदीप घोरपडे, राष्ट्रवादी विद्यार्थ्यांचे नेते भूषण भदाणे, सुनील शिंपी, श्रीनाथ पाटील, सनी गायकवाड, अनिरुद्ध शिसोदे, सारांश सोनार, योगेश घोडके यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बन्सीलाल भागवत यांनी केले. वाल्मीक मराठे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. एम. पाटील, छाया सोनवणे, पवार आप्पा, विठ्ठल पाटील,डी. एम. पाटील,डॉ. राहुल निकम,संदीप जैन,राजू पाटील, यतीन पवार, बाळू बिऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले.