वित्त आयोगाच्या निधीत अपारदर्शकता आढळल्यास हयगय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 21:35 IST2017-09-20T21:32:27+5:302017-09-20T21:35:42+5:30
शासनाकडून ग्राम पंचायतीसाठी येणाºया १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या अपहाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. हा निधी ग्रामीण भागाच्या विकासासाठी येत असून, या निधीचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. मात्र या निधीबाबतीत कोणत्याही अधिकाºयाने अपारदर्शकपणे काम केल्यास त्या अधिकाºयाची हयगय केली जाणार नसल्याचा सूचना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत.

वित्त आयोगाच्या निधीत अपारदर्शकता आढळल्यास हयगय नाही
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२०--शासनाकडून ग्राम पंचायतीसाठी येणाºया १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या अपहाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. हा निधी ग्रामीण भागाच्या विकासासाठी येत असून, या निधीचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. मात्र या निधीबाबतीत कोणत्याही अधिकाºयाने अपारदर्शकपणे काम केल्यास त्या अधिकाºयाची हयगय केली जाणार नसल्याचा सूचना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहु महाराज सभागृहात बुधवारी जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
तब्बल ८ आठ तास चालली बैठक
सकाळी १० वाजता या बैठकीला सुरवात झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती. बैठकीत शासनाकडून प्राध्यान्यक्रमे सुरु असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये घरकुल योजना, स्वच्छ भारत योजनेअंतर्गत येणाºया शौचालय बांधकामाचा आढावा घेण्यात आला.