शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर अफवा पसरविल्यास थेट कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 16:15 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी पोलीस व जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवेमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याच्या यापूर्वी घटना घडल्या आहेत. त्यामुळे या उत्सवात फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप व व्टीटर या सारख्या सोशल मीडियावर कोणी अफवा पसरविली तर त्या व्यक्तीची थेट पोलीस कोठडीतच रवानगी केली जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे पोलीस अधीक्षकांचा इशारा आंबेडकर जयंतीसाठी पोलीस व जिल्हा प्रशासन सज्ज जिल्ह्यात ६२२ ठिकाणी निघणार मिरवणुका

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी पोलीस व जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवेमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याच्या यापूर्वी घटना घडल्या आहेत. त्यामुळे या उत्सवात फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप व व्टीटर या सारख्या सोशल मीडियावर कोणी अफवा पसरविली तर त्या व्यक्तीची थेट पोलीस कोठडीतच रवानगी केली जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तरित्या जिल्ह्यातील सर्व विभागाच्या प्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाने काय खबरदारी घ्यावी याच्या सूचना दिल्या आहेत. महावितरण, अग्निशमन दल, आपत्ती कक्ष यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात ६२२ मिरवणुकाडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ ते ३० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात ६२२ मिरवणुका निघणार आहेत. त्यापैकी ४३३ मिरवणुका या १४ एप्रिल रोजीच निघणार आहेत. त्यात रॅली १३, भीमगीत व अन्य कार्यक्रम ५, पुतळा पूजन १०३ व प्रतिमा पूजन १९४ असे कार्यक्रम होणार आहेत. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी गुंड, गुन्हेगार, उपद्रवी व्यक्ती तसेच अवैध धंदे चालक यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यात सीआरपीसी १०७ प्रमाणे ३१७, ११० प्रमाणे ३९, १४९ प्रमाणे ३०६ व १४२/२ प्रमाणे ७६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. संवेदनशील भागावर अधिक लक्षजिल्ह्यातील संवेदनशील भागावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक यांनी स्वत: जावून बैठका घेतल्या आहेत. याशिवाय स्ट्रायकिंग फोर्स १७, आरसीपी प्लाटून ८ व एआरटी प्लाटून ८ या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. प्रत्येक उपअधीक्षकासोबत एक आरसीपी प्लाटून असणार आहे.आक्षेपार्ह मजकूर डिलीट कराउत्सवाच्या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आला तर त्याला तत्काळ डिलीट करा किंवा पोलिसांना त्याची माहिती द्या. जी व्यक्ती असा मजकूर,फोटो, क्लीप, आॅडीओ, व्हीडीओ प्रसारीत करेल किंवा लाईक,कमेंटस् व शेअर करेल त्या व्यक्तीविरुध्द भारतीय दंड संहिता कलम व माहिती तंत्रज्ञाद कायदा २००८ नुसार दखलपात्र गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा कराळे यांनी दिला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा