शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

बुडालेल्यास २२ तासानंतर काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 13:21 IST

रामदेववाडी शिवारातील घटना : नळांना पाणी आले नाही म्हणून आंघोळीला गेला अन् जीव गमावला

जळगाव : चार दिवसापासून नळांना पाणी येत नसल्याने गावाशेजारीच असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेलेल्या चेतन साहेबराव राठोड (१८) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रामदेववाडी, ता.जळगाव येथे घडली आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता बुडालेल्या या तरुणाचा मृतदेह तब्बल २२ तासांनी म्हणजे रविवारी सकाळी ७ वाजता हाती लागला. मृतदेह शोधण्यासाठी महापालिकेचे पथक त्याशिवाय रामदेववाडी, शिरसोली, पाथरी, म्हसावद व गालापूर येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदेववाडीसह परिसरातील वावडदा, वडली, जळके येथे बाराही महिने पाणी टंचाई असते. उन्हाळ्यात तीव्र स्वरुपाची पाणी टंचाई जाणवते. रामदेववाडी येथे चार दिवसापासून नळांना पाणी येत नसल्याने गावातील तरुण तलावात आंघोळीसाठी जातात. शनिवारी चेतन, नवल पांडूरंग राठोड व सागर धनराज राठोड असे तिघं जण तलावात आंघोळीसाठी गेले. नवल व सागर तलावाकाठी मोबाईलवर टिकटॉक व्हिडीओ तयारी करीत असताना चेतन आंघोळीसाठी उतरला. पोहता येत नसल्याने तो खोल खड्डयात गेला अन् जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करायला लागला. हा प्रकार पाहून सागर व नवल दोघं जण मदतीला धावले, त्याशिवाय तलावाच्या दुसºया काठावर मासेमारी करीत असलेलेल हौसीलाल भोई हे देखील धावून आले. मात्र तलाव खोल व गाळ खूप प्रमाणात असल्याने चेतन हाती लागला नाही. त्यांनी हा प्रकार लागलीच गावात कळविला.पट्टीच्या पोहणाऱ्यांनी घेतला दिवसभर शोधचेतन पाण्यात बुडाल्याची माहिती रामदेववाडी व वावडदा गावात पसरल्यानंतर गावकºयांनी धाव घेऊन तलावात शोध कार्य राबविले. वावडदा येथील रवींद्र त्र्यंबक पाटील (कापडणे) यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती देऊन मनपाचे पथकही मागविले. उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सचिन देशमुख व संदीप पाटील यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून मदत मागविली. त्याशिवाय परिसरातील पट्टीच्या पोहणाºयांना पाचारण करण्यात आले. दिवसभरात ५० च्याव तरुणांनी तलावात चेतनचा शोध घेतला, मात्र काहीही उपयोग झाला नाही. रात्री उशिरा शोध मोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर रविवारी सकाळी चेतनचे नातेवाईक नानाभाऊ जेरी चव्हाण (रा.तळवण तांडा, ता.भडगाव) यांनी परत तलावात उडी घेऊन शोध मोहीम राबविली असता सात वाजता चेतनचे डोक त्यांच्या हाताला लागले. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. शनिवारी सकाळी ९ ते रविवारी सकाळी ७ असे २२ तास शोध कार्य चालले.कर्ता तरुण गेल्याने कुटुंबासमोर संकटचेतन हा कुटुंबातील कर्ता पुरुष होता. वडील साहेबराव हरी राठोड, आई द्वारकाबाई, व लहान भाऊ नितीन शेती व मजुरी करतात. कौटुंबिक व आर्थिक परिस्थित अत्यंत हलाकीची आहे. बहिण चैताली समाधान चव्हाण विवाहित आहे. चेतनच्या मृत्यूने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. रवींद्र पाटील व म्हसावदचे पोलीस कर्मचारी सचिन देशमुख यांना सकाळी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सचिन मुंडे यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.चेतन बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या शोध कार्यासाठी पंचक्रोशीतील पट्टीचे पोहणारे तसेच मनपाचे पथक बोलावले. दिवसभर व रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबविली. नळांना पाणी न आल्याने चेतन आंघोळीसाठी तलावात गेला होता. पाणी पुरवठा होत नसल्याने अनेक तरुण येथे आंघोळीसाठी जातात. कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे.-रवींद्र त्र्यंबक पाटील (कापडणे), सामाजिक कार्यकर्ते, वावडदा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव