शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

वाकडी प्रकरण : बाराव्या दिवशी पटली खऱ्या विहिरीची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:41 PM

पोलीस ‘बॅकफूट’वर

ठळक मुद्देखोट्या विहिरीचा पंचनामा रद्दपीडित २ नव्हे तर ४ अल्पवयीन

विकास पाटीलजळगाव : जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहण्यासाठी गेले म्हणून मातंग समाजातील अल्पवयीन मुलांना नग्न करुन अमानुषपणे मारहाण करीत त्यांची धिंड काढल्याप्रकरणी पोलिसांनी आज चौघा आरोपींच्या व पीडित मुलांच्या समक्ष खºया विहिरीचा पंचनामा केला. घटना घडल्यानंतर १२ व्या दिवशी पोलिसांकडून खºया घटनास्थळाची निश्चिती करण्यात आली.वाकडी येथील ईश्वर बळवंत जोशी यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना १० जून रोजी घडली होती. त्यानंतर तीन दिवसानंतर गुन्हा दाखल झाला होता.त्यावेळी पोलिसांनी खरी विहीर सोडून दुसºयाच विहिरीचा पंचनामा केला होता, यावरुन प्रचंड नाराजी व्यक्त झाली होती. त्याची दखल पोलीस प्रशासनाला घ्यावी लागली.अन् संभ्रम दूर झालाआरोपींच्या समक्ष पीडितांनी आज दिलेल्या जबाबामुळे पोलिसांना दोन पावले मागे यावे लागले. आधीचे घटनास्थळ रद्द ठरवून पीडितांनी सांगितलेल्या विहिरीचा पंचनामा करीत तेच खरे घटनास्थळ असल्याचे आपल्या पंचनाम्यात नमूद करावे लागले. या घडामोडीमुळे गेल्या १२ दिवसांपासूनचा संभ्रम आज दूर झाला.आरोपींच्या नातेवाईक महिलांना अश्रू अनावरआरोपी ईश्वर जोशी याच्यासह चौघांना घटनास्थळी आणण्यात आल्याने ग्रामस्थांनी व त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही ईश्वर जोशी याच्या चेहºयावर पश्चाताप दिसत नव्हता. इतर आरोपींच्या भेटीसाठी आलेल्या नातेवाईक महिलांना मात्र अश्रू अनावर झाले होते.आठव्या दिवशी ओसरली गर्दीमानवतेला काळिमा फासणारी ही घटना उघडकीस आल्यानंतर १४ ते २० जूनपर्यंत वाकडी गावात राज्याच्या कान्याकोपºयातील विविध सामाजिक, राजकीय संघटनांचे शिष्टमंडळ, मीडियाचे प्रतिनिधी आदींची घटनास्थळी गर्दी होत होती. मात्र गुरुवार, २१ जून रोजी ही गर्दी ओसरली.लहुजी संघर्ष सेनेचे राज्य युवक अध्यक्ष स्वप्नील सपकाळे यांच्यासह ग्रामस्थ व पोलीस यांच्याव्यतिरिक्त घटनास्थळी कुणीही नव्हते.पीडित मुलांनी दाखविली खरी विहीरघटना घडल्यानंतर तब्बल ११ व्या दिवशी पोलिसांनी गुरुवार, २१ जून रोजी संशयित आरोपी ईश्वर बळवंत जोशी, प्रल्हाद कैलास लोहार, अजित कासम तडवी व शकनूर सरदार तडवी (सर्व रा.वाकडी) या चौघांना आज पोलीस बंदोबस्तात वाकडी गावात आणण्यात आले. ईश्वर जोशी यांच्या शेतातील दोन्ही विहिरींवर त्यांना नेण्यात आले. त्यापैकी कर्णाफाटाच्या दिशेने असलेल्या विहिरीतच १५ मुले पोहत होते. त्यापैकी ४ मुलांना पकडून त्यापैकी दोन अल्पवयीन मुलांना मारहाण करण्यात आल्याचे त्या पीडित मुलांनी आज पोलिसांनी घटनास्थळी सांगितले. पीडित मुलांनी आरोपींच्या समक्ष संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना पुन्हा एकदा सांगितला, त्यानुसार पोलिसांकडून आधीच्या विहिरीचा पंचनामा बाद करुन खºया विहिरीचाविहिरीजवळील खोलीनजीकच तयार केला व्हिडिओकर्णा फाट्याच्या दिशेने असलेल्या विहिरीतून बाहेर काढल्यानंतर मुले शेतात पळाली. त्यांचा पाठलाग करीत चौघा आरोपींनी त्यांना पकडले व नग्न करुन शेतातून त्यांची धिंड काढत ईश्वर जोशी यांच्या शेतातील एका खोली (शेतीचे साहित्य ठेवण्यासाठी तयार केलेली) जवळ आणले. तेथील ओट्यावर आरोपी प्रल्हाद लोहार याने पट्टयाने मारहाण केली तर ईश्वर जोशी याने व्हिडिओ शुटींग केली व अजित व शकनूर यांनी त्यांना मदत केल्याचे पीडित मुलांनी आज पोलिसांना घटनास्थळी सांगितले. त्यानुसार त्यांचा जबाब नोंदून घेतला.४ पैकी दोन मुलांना मारहाणया प्रकरणात २ नव्हे तर ४ अल्पवयीन मुले पीडित असल्याचे आज समोर आले. विहिरीत एकूण १५ मुले पोहत होते. त्यापैकी ४ मुलांचा पाठलाग करुन पकडण्यात आले. त्यापैकी मातंग समाजाच्या दोन मुलांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. तर उर्वरित दोघांपैकी एकाला निमोनिया झाला असल्याचे त्या मुलाने सांगितल्याने तर दुसरा फारच लहान असल्याने आरोपींनी त्यांना खूप मारहाण केली नाही, असे मातंग समाजातील त्या दोन पीडित मुलांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पंचनामा करण्यात आला.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव