मी राष्ट्रवादी व सेनेबरोबरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 16:59 IST2019-11-23T16:59:06+5:302019-11-23T16:59:17+5:30
आमदार चंद्रकांत पाटील

मी राष्ट्रवादी व सेनेबरोबरच
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे खेवलकर यांचा पराभव करून विजयी झालेले अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेबद्दल जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात उत्सुकता होती. चंद्रकांत पाटील हे मुंबईत ठाण मांडून आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांच्याशी संपर्क साधला असता आपण कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस व शिवसेनेसोबत असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.