पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:56+5:302021-08-13T04:21:56+5:30

जळगाव : महिनाभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केल्यानंतर आता पतीनेही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ...

Husband's suicide after wife's suicide | पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही आत्महत्या

पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही आत्महत्या

जळगाव : महिनाभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केल्यानंतर आता पतीनेही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सुप्रीम कॉलनीत घडली. जुबेर मोहम्मद हनिफ खाटीक (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे जुबेर याने आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनीतील रहिवासी जुबेर मोहम्मद हनिफ खाटीक (वय ३५) हा तरुण रिक्षा चालवून कुटुंबीयांचा उदनिर्वाह चालवत होता. पत्नी नजमाबी बचत गट तसेच भिशी चालवत होती. कुटुंबाला हातभार लावत होती. बचत गटाच्या कर्जामुळे नजमाबी यांनी गेल्या महिन्यातच स्वयंपाक घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यातच गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता पती जुबेर याने घरात एकटा असतांना वरच्या मजल्यावरील खोलीत ओढणीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने जुबेरला खाली उतरवून तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. जुबेरच्या पश्चात दहा वर्षीय मुलगी नुजहत आहे. महिन्याभरात चिमुरडी अनाथ झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याचा प्राथमिक तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहेत.

Web Title: Husband's suicide after wife's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.