तीन प्रियकरांच्या मदतीने पतीचा खून

By Admin | Updated: March 2, 2017 00:32 IST2017-03-02T00:32:57+5:302017-03-02T00:32:57+5:30

चाळीसगाव : चार जणांना अटक

Husband's blood with the help of three lovers | तीन प्रियकरांच्या मदतीने पतीचा खून

तीन प्रियकरांच्या मदतीने पतीचा खून

चाळीसगाव : तीन प्रियकरांसोबत  अनैतिक संबंध ठेवणाºया  पत्नीनेच कट रचून पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी  पत्नीसह तिघा प्रियकरांविरुद्ध खुनाचा  गुन्हा दाखल केला आहे. चौघांना अटक करण्यात आली आहे.
 कैलास रंगनाथ पवार (वय ४०, रा.रोहिले, ता.नांदगाव, जि.नाशिक) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
  बेलगंगा-भोरस या अडचणीच्या व निर्मनुष्य रस्त्यावर २० रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह मिळून आला होता. तो कैलास पवारचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.  
 कैलास   पवार हा   हरविल्याची तक्रार त्याची पत्नी राधा कैलास पवार हिने नांदगाव पोलिसात दिली होती. यानंतर  तिने नातेवाइकांसह चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन जळालेल्या अवस्थेतील मृतदेह हा पतीचा असल्याचे सांगितले.
चौकशीत राधाबाईने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला असता राधाबाई हिने   प्रियकर गौतम धना सोनवणे  (रा.लोहारी, ता.पाचोरा), उमेश उर्फ गुड्या वना पाटील व साहेबराव विक्रम कोळी (दोन्ही रा.उंबरखेड, ता. चाळीसगाव) यांच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले.
गौतम सोनवणे व  कैलास पवार यांच्यात मारामारी झाली होती.         त्या वेळी  उमेश  पाटील व साहेबराव विक्रम कोळी यांनी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यास पेटवून ठार मारले होते.
         (वार्ताहर)

Web Title: Husband's blood with the help of three lovers