नवऱ्याला पाच ग्रॅमच्या अंगठीसाठी बायकोचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST2021-06-11T04:12:55+5:302021-06-11T04:12:55+5:30

जळगाव : नवऱ्याला पाच ग्रॅमची अंगठी आणि दिराला फ्लॅट घेण्यासाठी ५० हजार रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह ...

Husband tortures wife for five gram ring | नवऱ्याला पाच ग्रॅमच्या अंगठीसाठी बायकोचा छळ

नवऱ्याला पाच ग्रॅमच्या अंगठीसाठी बायकोचा छळ

जळगाव : नवऱ्याला पाच ग्रॅमची अंगठी आणि दिराला फ्लॅट घेण्यासाठी ५० हजार रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चार जणांवर गुरुवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाल्मिक नगरातील माहेर असलेल्या ज्योती यांचा नाशिक येथील राहुल बापू डावरे यांच्याशी २५ जुन २०२० रोजी रितीरिवाजानुसार विवाह झाला. लग्नाच्या काही दिवसांपासूनच घरात विवाहितेला टोमणे मारणे सुरू झाले. लग्नात मानपान दिला नाही, तसेच पती राहूल याला ५ ग्रॅमची अंगठी घेतली नाही. यासाठी पती राहूल, सासू लता बापू डावरे, दिर विक्रम बापु डावरे, नणंद नेहा बापू डावरे (सर्व रा. पंचवटी नाशिक) यांनी टोमणे मारणे सुरु केले. पती राहूलसाठी ५ ग्रॅमची अंगठी आणि दीर विक्रम डावरे याला मुंबई प्लॅट घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावे यासाठी छळ सुरू केला. याला कंटाळून विवाहिता २५ सप्टेंबर २०२० रोजी माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास राजेंद्र पाटील करीत आहे.

Web Title: Husband tortures wife for five gram ring