कौटुंबिक वादातून पतीने पाण्यात बुडवून पत्नीची केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 08:28 PM2020-06-02T20:28:10+5:302020-06-02T20:28:35+5:30

सोनद नदीवरील घटना

Husband kills wife by drowning in family dispute | कौटुंबिक वादातून पतीने पाण्यात बुडवून पत्नीची केली हत्या

कौटुंबिक वादातून पतीने पाण्यात बुडवून पत्नीची केली हत्या

Next


शेंदुर्णी, ता. जामनेर : येथील फुकटपुरा वस्तीत वास्तव्यास असलेल्या भील समाजातील एक जोडपे हे १ रोजी मासे पकडण्यासाठी येथून जवळच असलेल्या जंगीपुरा येथे सोनद नदीवरील पाणी साठवण तलावात गेले असता नवरा-बायकोमध्ये वाद वाढून पतीने पत्नीची पाण्यात बुडवून हत्या केली आहे. यानंतर पती हा स्वत: पोलीस स्टेशनला हजर झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, प्रकाश मोरे रा. वावडदा, ता. जळगाव व त्याची पत्नी मंगलाबाई मोरे या दोघांमध्ये कौटुंबिक कलह सुरू होता. दरम्यान ते मंगलाबाईच्या माहेरी शेंदुर्णी येथे फुकट पुरा वस्तीमध्ये वास्तव्यास होते. दिनांक १ जून रोजी येथून जवळ असलेल्या जंगिपुरा शिवारामध्ये हे पती व पत्नी साठवण तलावात मच्छी पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यात भांडण होऊन रागाच्या भरात पतीने पत्नीला पाण्यात बुडवून ठार केले. यानंतर पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व हकीकत कथन केली.
तर दुसरीकडे सायंकाळपर्यंत दोघेजण घरी न आल्याने महिलेचा भाऊ गजानन गायकवाड याने चौकशी केली असता त्याला त्याच्या भाचीला सांगितले की, मला वावडदा वरून फोन आला होता की, माझ्या मायला माज्या बापाने पाण्यात बुडवून मारले आहे. यावरून मयत महिलेचा भाऊ, मुलगा, मुलगी, बहिण आणि इतर सदस्य यांनी त्वरित जंगिपुरा शिवारातील सोनद नदीवरील साठवण तलाव गाठला आणि पाण्यात उतरून बघितले असता मंगलाबाई या मृत झाल्याचे समजले. त्यांनी पोलीस स्टेशन गाठत खुनाची माहिती दिली. असता पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी व शेंदुर्णी दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मंगलाबाईचे शव पाण्यातून बाहेर काढले. तर पती प्रकाश मोरे यास अटक करण्यात आली असून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे हे करीत आहे.

Web Title: Husband kills wife by drowning in family dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.