पत्नी माहेरी निघून गेल्याने पतीने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 16:32 IST2019-08-30T16:24:10+5:302019-08-30T16:32:30+5:30
खिरवड येथील प्रकार : अकस्मात मृत्यूची नोंद

पत्नी माहेरी निघून गेल्याने पतीने केली आत्महत्या
रावेर : तालुक्यातील खिरवड येथील मनोविकाराने ग्रस्त जितेंद्र ज्ञानेश्वर गाढे (वय ३४) यास सोडून पत्नी माहेरी निघून गेल्याने संतापात त्याने शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, खिरवड येथील विवाहीत तरूण जितेंद्र ज्ञानेश्वर गाढे हा मनोविकाराने ग्रस्त असल्याने त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. पत्नी निघून गेल्याने जितेंद्र हा अस्वस्थ होता. याच विचारात त्याने ३० आॅगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरातील छताच्या अॅँगलला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. पोळ्याच्या दिवशी सणासुदीला झालेल्या या घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी शांताराम रामू गाढे यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जितेंद्र नारेकर पुढील तपास करीत आहेत.