पतीने केला पत्नीवर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: September 25, 2015 00:09 IST2015-09-25T00:09:51+5:302015-09-25T00:09:51+5:30
धुळे : घरगुती वादात पतीने लोखंडी हातोडय़ाने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

पतीने केला पत्नीवर प्राणघातक हल्ला
धुळे : घरगुती वादात पतीने लोखंडी हातोडय़ाने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना 22 सप्टेंबरला रात्री 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील अग्रवाल भवन परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अग्रवाल भवन परिसरात राहणारा मनोज कृष्णा चारुंडे (वय 30) याला बाहेरगावी जायचे होते. म्हणून तो त्याची पत्नी कविता मनोज चारुंडे (वय 28) हिच्याकडून भाडय़ासाठी पैशांची मागणी करत होता. परंतु कविताने पैसे न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने मनोजने संतापाच्या भरात शिवीगाळ, दमदाटी करत कविताच्या डोक्यावर लोखंडी हातोडय़ाने वार केला. त्यामुळे कविताच्या कानाच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी कविताचे वडील सुभाष भिकू मोगाम (रा.अग्रवाल भवन परिसर, धुळे) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मनोज चारुंडेवर भादंवि कलम 307, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी मनोजला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.